ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाविरोधी लढाई जिंकण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग गरजेचे आहे. त्यामुळे येत्या १४ एप्रिलनंतर देशातील लॉकडाऊन पुर्णतः उठविले जाणार नाही, असे स्पष्ट संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत.
संसदेतील सर्वपक्षीय गटनेते व अन्य पक्षांच्या नेत्यांशी मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देशातील सद्यस्थितीवर चर्चा केली. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. देशात आतापर्यंत 5900 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर कोरोनाबळींची संख्या 178 वर पोहचली आहे. लोकांचे प्राण वाचविणे हेच सरकारचे प्रमुख उद्दिष्ट आहे, त्यामुळे देशव्यापी लॉकडाऊन 14 एप्रिलनंतर पूर्णतः उठणार नाही. त्यासंदर्भात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा
केली जाईल, असे मोदी यांनी स्पष्टपणे सांगितल्याची माहिती बैठकीतील मंत्र्यांनी दिली.
या बैठकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ,काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, शिवसेना खासदार संजयराऊत, सपाचे राम हगोपाल यादव आदी नेत्यांनी सहभाग घेतला होता.









