उद्योजक आनंद महिंद्रांनी केली चिंता व्यक्त : हव्या उपाययोजना
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिग्गज उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी लॉकडाऊनच्या वाढत्या निर्णयावर नकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. कारण आतापर्यंत तिसऱयांदा लॉकडाऊनची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. परंतु या निर्णयात आणखीन वाढ झाल्यास ही बाब देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी धोक्मयाची घंटा राहणार असल्याचे महिंद्रा यांनी म्हटले आहे.
लॉकडाऊन येत्या काळातही कायम ठेवणे हे आपल्या अर्थक्यवस्थेसाठी आत्मघातकी ठरेल. कारण सध्या सर्वसामान्यांसाठी अर्थचक्र सुरु ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा समाजातील दुर्बल घटकांना मोठय़ा संकटाचा सामना करावा लागेल असेही महिंदा यांनी म्हटले आहे. सरकारकडून अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्याची आवश्यकता सध्याच्या घडीला निर्माण झाली असल्याचे म्हटले आहे.
देशामधील कोरोनाच्या चाचणीची संख्या वाढली आहे. मात्र दुसऱया बाजूला कोरोनाबाधितांची संख्याही वेगाने वाढत आहे. त्यामुळे हा वाढता संसर्ग रोखण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी लागणार आहे. मास्क, पीपीई किट, ऑक्सिजन सुविधा यासह सामाजिक अंतर पाळण्याची गरज असल्याचेही याप्रसंगी महिंद्रा यांनी स्पष्ट केले आहे.
लॉकडाऊनमुळे जगाच्या तुलनेत आपल्या देशातील कोरोनाबाधितांची संख्या मर्यादीत असल्याचे नाकारता येत नाही. रुग्ण संख्या वाढत असल्याने ही बाब चिंताजनक असून यावर प्रभावी उपाय करण्याची गरज असल्याची माहिती आनंद महिंद्रा यांनी दिली आहे.









