वारणानगर / प्रतिनिधी
पोलीस दलाच्या शाहूवाडी विभागातील शाहूवाडी,पन्हाळा, राधानगरी, गगनबावडा या चार तालुक्यातील पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील महिला व युवतीवर होणाऱ्या छेडछाड व अत्याचाराला आळा बसवण्या साठी शाहूवाडी विभागातील निर्भया पथक लॉक डाऊन नतंर पुन्हा सुरू झाले असून या पथका मार्फत कायदा व सुव्यवस्थेच्या कामा बरोबरच गस्त देखील सुरू केल्याची माहिती निर्भया पथकाच्या प्रमुख सहा. पोलीस निरीक्षक शैलजा पाटील यानी दिली.
कोरोना विषाणू संसर्ग प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉक डाऊन सुरू केल्यापासून निर्भया पथकाचे काम बंद ठेवले होते सद्या लॉक डाऊन संपुष्टात आल्याने कोल्हापूर जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधिक्षक तिरुपती काकडे यांच्या आदेशान्वये व शाहूवाडी विभागाचे पोलीस उपअधिक्षक अनिल कदम यांच्या मार्गदर्शना खाली पुन्हा निर्भया पथक कार्यरत करण्यात आले आसून एक अधिकारी तीन महिला व दोन पोलीस कर्मचारी या पथकात कार्यरत आहेत असे सहा. पोलीस निरीक्षक शैलजा पाटील यानी सांगीतले.
सध्या शाळा, महाविद्यालये बंद आहेत त्यामुळे शाळेच्या आवारातील तरुणीना होणाऱ्या छेडछाडीचे प्रमाण कमी झाले आहे निर्भया पथकामुळे महिला व तरुणीवर होणारे अत्याचार होण्याचे प्रमाण देखील कमी झाले आहे.तथापी लॉक डाऊन काळात कोणत्याही माहिलेला अथवा तरुणीला प्रत्यक्ष अथवा भ्रम्हणध्वनीद्वारे छेडछाड, त्रास देण्याचा प्रयत्न कोणी केला असेल अशा पिडीत माहिला व तरुणीनी प्रत्यक्ष निर्भया पथकाकडे अथवा पथकाच्या भ्रम्हणध्वनी क्रमांक ९४०३९५६०३३ यावर संपर्क करून आपली तक्रार नोंदवण्याचे आवाहन सहा. पोलीस निरीक्षक शैलजा पाटील यानी केले आहे.