वारणानगर / प्रतिनिधी
लॉकडाऊन काळासह नियमित वापरातील वीज बीलातील स्थिर आकार कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन कोडोली व्यापारी असोसिएशनच्या वतीने आमदार डॉ.विनय कोरे यांना देण्यात आले.कोडोली ता. पन्हाळा येथील व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष बाबासो पाटील, उपाध्यक्ष सुरज शहा,सदस्य संजय बजागे,नरेंद्र उबारे,उत्तम पाटील, संतोष मुदगल, रवी गाताडे, सागर जाधव यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी लॉकडाऊन काळात कोडोलीतील प्रमुख बाजारपेठेसह ठिकठिकाणीचे दुकाने बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शिवाय दुकानदारांसह घरगुती वीज बीलाचा मोठा फटका देखील प्रत्येक नागरीकाला बसलेला आहे. त्यामुळे विज बिलातील स्थिर आकार कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा. कोडोली एम.एस.ई.बी.ने वीज बिलातील स्थिर आकार लागू केलेला आहे. तो पूर्णतः माफ करण्यात यावा अशी भूमिका अध्यक्ष बाबासो पाटील व शिष्ठमंडळाने आमदार कोरे यांच्याकडे मांडली.
वारणानगर ता. पन्हाळा येथे लॉकडाऊन काळातील वीज बिलातील स्थिर आकार कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा. या मागणीचे निवेदन आमदार डॉ.विनय कोरे यांच्याकडे देण्यात आले. यावेळी बाबासो पाटील. सुरज शहा,संजय बजागे,नरेंद्र उबारे,उत्तम पाटील,संतोष मुदगल रवी गाताडे, सागर जाधव उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









