प्रतिनिधी / पेठ वडगाव
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हाधिकारी यांनी सोमवार दि.२० ते २६ जुलै पर्यंत घोषित केलेल्या शंभर लॉकडाऊनचे नागरिकांनी पालन करावे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी कडक करण्यात आलेल्या या लॉकडाऊन कालावधीत पालिका व पोलीस प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून पालिका व पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांनी केले आहे.
कोल्हापूर जिल्हयामध्ये कोरोना रुग्णामध्ये भरपूर वाढ होत असलने जिल्हाधिकारी यांनी कोरोना विषणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सोमवार दि.२० ते २६ अखेर शंभर टक्के लॉकडाऊन घोषीत केला आहे. या लॉकडाऊनमध्ये वडगांव शहरातील दुध डेअरी व मेडीकल सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत व सायंकाळी पाच ते सात वाजेपर्यंत चालू राहतील. तसेच सर्व खाजगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा, पशुचिकीत्सालय तसेच बँका, एटीएम त्यांचे नियोजीत वेळेत चालू राहतील. पेट्रोल पंप फक्त अत्यावश्यक सेवेतील शासकीय वाहने, वैद्यकीय सुविधा पुरवणारी वाहने, शासकीय धान्य पुरवठा करणारी वाहने यासाठी चालू राहील. वर्तमानपत्रे वितरण सकाळी पाच ते सकाळी नऊ वाजे पर्यंत चालू राहील. एल.पी.जी. गॅस घरपोच सुविधा सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत चालू राहील.
बाहेरील जिल्हयातून प्रवासी येणेस व जाणेस तसेच लग्न, साखरपुडा, मुंज, वाढदिवस या कार्यक्रमास बंदी असेल, अंत्यविधीच्या कार्मक्रमाकरीता 10 नागरीकांना उपस्थित राहता येईल. वडगाव शहरामध्ये भाजीपाला, फळ विक्री इतर सर्व व्यवसाय आस्थापना बंद राहतील. या करीता सर्व नागरीक व व्यापारी यांनी नगरपालिका प्रशासन व पोलिस प्रशासनास सहकार्य करावे. जिल्हाधिकारी यांनी सर्व नागरीकांना आवाहन केले आहे. कोणीही अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडून नये, अन्यथा संबंधीतावर कडक कारवाई करणे भाग पडेल. कोरोनाचा वाढता धोका पाहता नागरिकांनी लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर पडू नये. प्रशासनाच्या नियमांचे पालन करून कोरोना संसर्गापासून दूर राहावे असे आवाहन वडगांव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मोहनलाल माळी, मुख्याधिकारी सुषमा कोल्हे, वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनी केले.
Previous Articleटिकटॉकला पर्यायी ‘रिल्स’ ॲप लवकरच…
Next Article सडोली खालसा येथे एक महिला पॉझिटिव्ह








