कबनूर/ वार्ताहर
कोरोनाचा सर्वात मोठा फटका तळागाळातील कष्टकरी असंघटित कामगारांना तसेच हातावर पोट असलेल्या जनतेला बसत आहे. हाताला काम नसलेने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा गरजू , गरीब नागरिक, अनुसूचित जाती – जमाती, भटके, विधवा, परितक्ता, एकल, अपंग तसेच समाजातून दुर्लक्षित घटक, रेशन कार्ड नसलेले किंवा अन्य कोणत्या कारणांनी रेशन धान्य मिळत नसेल अश्या नागरिकांना जिवनावश्यक वस्तू मिळाव्यात अशी मागणी श्रावस्ती बहुउद्देशीय सेवा संस्था कबनुर यांनी कबनूर ग्राम पंचायतीकडे केली आहे. ग्राम पंचायतीने याचे गांभीर्य लक्षात घेऊन हातकणंगले तालुक्यातील, तहसीलदार गटविकास अधिकारी यांच्याकडे पाठवुन तसा पाठपुरावा करावा. तसेच गरजू गरीब जनतेला मिळवून देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्या संदर्भात भाग पाडण्यात यावेत अशी निवेदनात मागणी केली आहे. या मागणीमुळे गरजवनतांना जिवनावश्यक वस्तू मिळण्यासाठी शासन स्थरावर प्रयत्न सुरू व्हावेत असे म्हंटले आहे.









