पुणे \ ऑनलाईन टीम
ज्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट जास्त आहे तिथे निर्बंध कायम राहणार आहेत तर इतर सर्व ठिकाणी काही प्रमाणात शिथिलता मिळू शकते, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. लॅाकडाउन मात्र कायम राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. पुण्यामध्ये आज राजेश टोपे यांनी साखर संकुलात कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यावेळेस बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.
ज्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट अजूनही जास्त आहे, त्या ठिकाणी आणखी १५ दिवस लॉकडाऊन वाढणार हे जवळपास निश्चित आहे. दरम्यान जिथे कोरोनाची साथ आटोक्यात आली आहे तिथे काही प्रमाणात शिथिलता मिळू शकते. पण संपूर्ण लॉकडाऊन उठवण्याचा प्रश्नच येत नाही, असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
राज्यातील २१ जिल्ह्यांत फैलाव कायम असून, म्युकरमायकोसिसच्या संकटाचा धोका लक्षात घेऊन लॉकडाऊनमध्ये १५ दिवस वाढ करण्याबाबत गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहमती दर्शवण्यात आली. काही निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येणार असून, दुकानांच्या वेळा वाढविण्यासह अन्य काही सवलती देण्याचा प्रस्ताव आहे.
Previous Articleचक्रीवादळांचा मान्सूनवर परिणाम नाही; 31 मे ला मान्सून केरळात
Next Article यूपी : अलिगडमध्ये विषारी दारू पिऊन 9 जणांचा मृत्यू








