मुंबई / ऑनलाईन टीम
देशासह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री, विरोधक आणि तज्ज्ञांशी चर्चा केली आहे. लवकरच याबाबत निर्णय झाला पाहिजे. तसेच सध्या लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, पण पहिल्यांजा हातावर पोट आहे त्यांच्याकरिता काही करावं लागेल, असे महसूलमंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, लॉकडाऊनमध्ये कामगारांना काय मदत द्यायची याबाबत अर्थमंत्र्यांबरोबर चर्चा केली जाईल. हातावर पोट आहे त्यांच्याकरिता काही करावं लागेल. लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही असं मला वैयक्तिक वाटते. तसं केलं नाही तर हा संसर्ग वाढत जाणार आहे. आपण गेल्यावेळी दररोज १० लाख लोकांच्या जेवणाची व्यवस्था केली. बाहेरच्या राज्यातील मजुरांची व्यवस्था केली. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त चांगलं काम झालं. केंद्राने काय पॅकज दिलं आम्हाला समजलं नाही, असा आरोप थोरातांनी भाजपवर केला.
पहिली फेज आपण यशस्वी हाताळली तेव्हा महाराष्ट्रातील या सरकारचं अभिनंदन सगळ्यांनी केलं हे विसरू नये. आता दुसरी फेज आहे संसर्ग जास्त आहे, सतर्कपणे सरकार परिस्थिती हाताळत असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी यावेळी सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








