वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
देशातील संपूर्ण राज्य लॉकडाऊमुळे ठप्प आहेत. अत्यावाश्यक सेवा वगळता अन्य व्यवसायांमधील देवाणघेवाण बंद आहे. कोरोनाच्या धास्तीने नागरिक रोख व्यवहारांसाठी पुढाकार घेत नसल्याचे दिसून आले आहे. याचाच परिणाम म्हणून रोख आर्थिक व्यवहारांमध्ये मागील महिन्यात मोठी घट नोंदवण्यात आली आहे. तर दुसऱया बाजूला डिजिटल व्यवहारांमध्ये वेगाने वाढ झाली आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार मार्चमध्ये बँकांचे रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंटच्या (आरटीजीएस) व्यवहारात 34 टक्क्मयांनी वाढ झाल्याचे म्हटले आहे. मार्च महिन्यात आरटीजीएसच्या माध्यमातून जवळपास 120.47 लाख कोटी रुपयाचे व्यवहार झाले आहेत. जे फेब्रुवारी 2020 मध्ये 89.90 लाख कोटी रुपयाचे व्यवहार झाल्याचे आरबीआयने सांगितले आहे.
लॉकडाऊनमुळे आर्थिक आणि त्याच्याशी संबंधीत असणाऱया सेवांमध्ये घसरण आली आहे. यात डेबिट आणि पेडिट कार्डच्या माध्यमातून एटीएमवरुन रोख रक्कम काढण्याच्या प्रमाणात घसरण झाली असल्याचे इंडियन एक्स्प्रेसच्या अहवालनुसार व काही तज्ञांच्यानुसार हे स्पष्ट केले आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन आणि लहान कंपन्या आपल्या कर्मचाऱयांना घरातून काम करण्याच्या सुचना दिल्या आहेत. तसेच यातून सामाजिक अंतर राखण्याचेही सांगितले आहे. यामुळे मार्चच्या तिसऱया आणि चौथ्या आठवडय़ात डिजिटल व्यवहारात वेगाने वाढ झाल्याची नोंद केली आहे.









