वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना महामारीमुळे पंतप्रधान मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊनचा निर्णय तातडीने घेतल्याने मणिपूरचा 17 वषीय बॅडमिंटनपटू मेसनाम मीराबा लुवांग याला बेंगळूरच्या प्रकाश पदुकोन बॅडमिंटन अकादमीमध्ये रहावे लागत आहे. त्याच्याबरोबर दोन स्वयंपाकी या अकादमीमध्ये वास्तव्य करीत आहेत.
बेंगळूरच्या प्रकाश पदुकोन अकादमीमध्ये आता मणिपूरचा मीराबा हा एकमेव बॅडमिंटनपटू वास्तव्य करीत आहे. 25 मार्च रोजी संपूर्ण देशात कोरोना महामारीला प्रतिबंध करण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय पंतप्रधानांनी घेतला. संपूर्ण वाहतूक बंद झाल्यामुळे मीराबा आपल्या घरी जाऊ शकला नाही. प्रकाश पदुकोन अकादमीतर्फे शेजारीच असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये मीराबा वास्तव्य करीत असून त्याच्यासमवेत या अकादमीतील दोघे स्वयंपाकीही आहेत. याच अपार्टमेंटजवळ बॅडमिंटनपटू सेन बंधू यांचे स्वतःच्या मालकीचे प्रशस्त निवासस्थान आहे. लक्ष्य आणि चिराग सेन हे शेजारी असल्याने मीराबाला त्यांच्याकडून वारंवार अत्यावश्यक वस्तूंची मदत पुरविली जात आहे. मीराबा लुवांग 26 मार्च रोजी मणिपूरला जाण्यासाठी विमानाचे तिकीट आरक्षित केले होते. पण 24 मार्चच्या मध्यरात्रीपासून देशांतर्गत विमानसेवा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने त्याला बेंगळूरमध्येच रहावे लागत आहे. मीराबा लुवांग याचे वडील रोमेश हे मणिपूर स्पोर्ट्स विभागात बॅडमिंटन प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. गेल्या वषीच्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या कोरिया कनि÷ांच्या खुल्या आंतरराष्ट्रीय चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धेत मुलांच्या 19 वर्षाखालील वयोगटात मीराबा लुवांगने एकेरीचे अजिंक्मयपद मिळविले होते. जानेवारी 2020 च्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन फेडरेशनच्या कनि÷ पुरुष एकेरी मानांकनात मीराबा लुवांग तिसऱया स्थानावर होता तर 17 मार्च रोजी घोषित करण्यात आलेल्या मानांकन यादीत मीराबाने दुसरे स्थान मिळविले आहे.









