नियमभंग करणाऱया 31,781 वाहन चालकांचा समावेश
शैलेश तिवरेकर / पणजी
लॉकडाऊनच्या काळात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱया वाहन चालकांविरोधात पोलिसांनी 25 मार्च ते 20 एप्रिलपर्यंत केलेल्या कारवाईत 31 हजार 781 वाहनचालकांना दंड ठोठावला असून त्यांच्याकडून एकूण 40 लाख 1 हजार 950 रुपयांची दंडात्मक रक्कम वसूल केली आहे. एकूण 374 वाहने जप्तही करण्यात आहेत.
लॉकडाऊनच्या काळातही मोठय़ाप्रमाणात वाहने रस्त्यावर येत आल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीची पाहणी केल्यास अधिकाधिक कारवाई दक्षिण गोव्यात झाल्याचे दिसून येत आहे.

मडगाव, कोलवात हजारांवर तक्रारी
दक्षिण गोव्यात वरील काळात 22 हजार 540 वाहनचालकांना दंड ठोठावण्यात आला आहे. त्यात 29 लाख 63 हजार 350 रुपयांची दंडात्मक रक्कम वसूल केली आहे आणि 214 वाहनेही जप्त केली आहेत. यामध्ये मडगाव पोलीस स्थानकाने 1 हजार 386 तक्रारी नोंद केल्या आहेत. त्यात 31 वाहने जप्त केली असून 1 लाख 58 हजार 500 रुपये दंडात्मक रक्कम जमा केली आहे.
कोलवा पोलीस स्थानकाने 10 वाहने जप्त केली असून 1 हजार 484 तक्रारी नोंद केल्या आहेत. तर 1 लाख 57 हजार 50 रुपये दंडात्मक रक्कम जमा केली आहे. कोलवा पोलीस स्थानकाने 815 तक्रारींची नोंद केली असून 14 वाहने जप्त केली आहे. तर 1 लाख 76 हजार 800 रुपये दंडात्मक रक्कम जमा केली आहे.
फातोडर्य़ात तब्बल तीन हजार तक्रारी
कुंकळी पोलिस स्थानकात 1 हजार 698 तक्रारी नोंद केल्या आहेत. तर 2 लाख 2 हजार 50 रुपये दंडात्मक रक्कम जमा केली आहे. फातोर्डा पोलीस स्थानकात 11 वाहने जप्त केली आहेत तर 3 हजार 630 तक्रारी नोंद केल्या असून 3 लाख 91 हजार 200 रुपये दंडात्मक रक्कम जमा केली आहे. केपे पोलीस स्थानकात 16 वाहने जप्त केली आहेत तर 772 तक्रारी नोंद केल्या आहेत व 82 हजार 500 रुपये दंडात्मक रक्कम जमा केली आहे.

काणकोण, सांगेतही मोठय़ाप्रमाणात उल्लंघन
कुडचडे पोलीस स्थानकाने 1 लाख 17 हजार 100 रुपये दंडात्मक रक्कम वसूल करताना 930 तक्रारी नोंद केल्या असून 16 वाहने जप्त केली आहेत. सांगे पोलीस स्थानकात 10 वाहने जप्त केली असून 761 तक्रारी नोंद केल्या आहेत तर 1 लाख 11 हजार 850 रुपये दंडात्मक रक्कम जमा केली आहे. काणकोण पोलीस स्थानकात 14 वाहने जप्त केली असून 1 हजार 37 तक्रारींची नोंद केली आहे तर 1 लाख 53 हजार 450 रुपये दंडात्मक रक्कम जमा केली आहे.
वास्को पोलीस स्थानकात 51 वाहने जप्त केली असून 1 हजार 518 तक्रारी नोंद केल्या आहेत. एकूण 2 लाख 72 हजार रुपये दंडात्मक रक्कम जमा केली आहे. वेर्णा पोलीस स्थानकात 12 वाहने जप्त केली आहेत. 1 हजार 940 तक्रारींची नोंद केली असून 4 लाख 25 हजार 450 रुपये दंडात्मक रक्कम जमा केली आहे. मुरगाव पोलीस स्थानकात 5 वाहने जप्त केली आहेत. 614 तक्रारींची नोंद केली आहे तर 74, 200 रुपये दंडात्मक रक्कम जमा केली आहे.
वास्को रेल्वे पोलिसांनी केलेल्या कारवाईत 458 तक्रारी नोंद केल्या आहेत तर 48 हजार 250 रुपये दंडात्मक रक्कम जमा केली आहे. दाबोळी विमानतळ पोलिसांनी 554 तक्रारींची नोंद केली आहे तर 74 हजार 700 रुपये दंडात्मक रक्कम जमा केली आहे. फोंडा पोलीस स्थानकात केलेल्या कारवाईत 10 वाहने जप्त केली आहेत 1 हजार 557 तक्रारी नोंद केल्या आहेत तर 3 लाख 74 हजार 750 कुळे पोलिसांनी केलेल्या कारवाईत 2 वाहने जप्त केली आहे. 500 तक्रारींची नोंद केली आहे तर 51 हजार 50 रुपये दंडात्मक रक्कम जमा केली आहे. कोंकण रेल्वे पोलिसांनी केलेल्या कारवाईत 886 तक्रारींची नोंद केली असून 91 हजार 600 रुपये दंडात्मक रक्कम जमा केली आहे.
उत्तर गोव्यात एकूण 9 हजार तक्रारी
उत्तर गोव्यात एकूण 9 हजार 241 तक्रारींची नोंद केली असून 160 वाहने जप्त केली आहेत तर एकूण 10 लाख 38 हजार 600 रुपये दंडात्मक रक्कम जमा केली आहे. यामध्ये पणजी पोलिसांनी केलेल्या कारवाईत 1 हजार 772 तक्रारी नोंद केल्या असून 1 लाख 90 हजार 100 दंडात्मक रक्कम जमा केली आहे. ओल्ड गोवा पोलीस स्थानकात 823 तक्रारींची नोंद केली असून 83 हजार 500 रुपये दंडात्मक रक्कम जमा केली आहे. आगशी पोलीस स्थानकात 334 तक्रारींची नोंद केली असून 37 हजार 400 रुपये दंडात्मक रक्कम जमा केली आहे.
म्हापसा पोलीस स्थानकात 1 हजार 327 तक्रारींची नोंद झाली असून 1 लाख 41 हजार 600 रुपये दंडात्मक रक्कम जमा केली आहे. हणजूण पोलीस स्थानकात 1 हजार 7 तक्रारींची नोंद झाली आहे. तर 1 लाख 43 हजार रुपये दंडात्मक रक्कम जमा झाली आहे. पेडणे पोलीस स्थानकात 496 तक्रारींची नोंद झाली असून 49 हजार 900 रुपये दंडात्मक रक्कम जमा केली आहे. पर्वरी पोलीस स्थानकात 1 हजार 33 तक्ररींची नोंद झाली असून 1 लाख 12 हजार 550 दंडात्मक रक्कम जमा झाली आहे. कळंगुट पोलीस स्थानकात 698 तक्रारींची नोंद झाली असून 78 हजार 550 दंडात्मक रक्कम जमा केली आहे. साळगाव पोलीस स्थानकात 563 तक्रारींची नोंद झाली असून 63 हजार 450 दंडात्मक रक्कम जमा केली आहे.
डिचोली पोलीस स्थानकात 636 तक्रारींची नोंद झाली असून 68 हजार 800 रुपये दंडात्मक रक्कम जमा झाली आहे. वाळपाई पोलीस स्थानकात 543 तक्रारींची नेंद झाली असून 1 लाख 8 हजार 450 रुपये दंडात्मक रक्कम जमा झाली आहे.









