फिलिपिन्सचे अध्यक्ष रॉड्रिगो ड्युटर्ट यांचा इशारा
ऑनलाईन टीम / मनिला :
जगात कोरोना विषाणूंच्या संसर्गामुळे अनेक देशांमध्ये लॉकडाउनची स्थिती असून, फिलिपिन्समध्ये कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्यात आली आहेत. फिलिपिन्सचे अध्यक्ष रॉड्रिगो ड्युटर्ट त्यांनी लॉकडाउनचा भंग करून घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना थेट गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत.
देशाला उद्देशून केलेल्या भाषणात ड्युटर्ट यांनी म्हटले आहे की, सर्वांनी लॉकडाउनच्या उपायोजना गांभीर्याने घ्यायला हव्यात. यासाठी आरोग्य सेवकांना सहकार्य करावे. यातून देशातील संसर्ग आटोक्यात येण्यास मदत होईल. लॉकडाऊन च्या काळात जर कोणी सहकार्य न करता त्रास देत असतील अथवा आरोग्य सेवकांचा जीव धोक्यात आणत असतील तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना पोलीस आणि लष्कराने गोळ्या घालाव्यात.
फिलिपिन्समध्ये आतापर्यंत कोरोनाचा 2,311 जणांना संसर्ग झाला आहे, तर 96 जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. ही परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता असून, सरकारकडून संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येत आहेत.









