कुंब्रल येथे मध्यरात्री पोलिसांची कारवाई
वार्ताहर / दोडामार्ग:
कुंब्रल येथे गावकऱयांच्या मदतीने गोवा बनावटीची दारू दोडामार्ग पोलिसांनी पकडले. ही कारवाई शनिवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या दरम्यान केली. या कारवाईत एकूण तीन लाख 45 हजार 920 चा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस उपनिरीक्षक सुनील बागल हे शनिवारी रात्री दरोडा पेट्रोलिंगच्या दरम्यान पेट्रोलिंग करीत असताना क्वॉलिस जीपमधून गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाया गाडीला ग्रामस्थांच्या मदतीने पकडले. या वाहतुकीला सहाय्य करणाऱया एका मोटारसायकल चालकही होता. जप्त केलेल्या दारुची किंमत दोन लाख 35 हजार 920, क्वालिसची किंमत एक लाख व एका स्प्लेंडरची किंमत 10 हजार असा एकूण तीन लाख 45 हजार 920 चा मुद्देमाल जप्त केला आहे. तीन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यात सतीश भीमराव आरदारकळ, अतुल वसंत शिंदे, शिरसाल अशोक बिराजदार (सर्व रा. हडकूळ ता. चंदगड, जि. कोल्हापूर, यांचा समावेश आहे. या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालय बंद असल्याने संशयितांना नोटीस बजावण्यात आली आहे. तिन्ही संशयित पोलिसांच्या ताब्यात आहेत.









