विविध क्षेत्रांमधील तज्ञांचे विश्लेषणः काही प्रमाणात सवलत ठरणार फायद्याची
नवी दिल्ली
कोरोना विषाणूच्या संकटात देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणाऱया क्षेत्रांपैकी काही क्षेत्रे अडचणीत येण्याची भीती व्यक्त होत आहे. कारण लॉकडाऊनचा कालावधी 14 एप्रिलपर्यंत निश्चित होता. परंतु त्यामध्ये आणखी वाढ करण्यात आल्याची घोषणा मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. त्यामुळे आणखीन दोन आठवडय़ांचा लॉकडाऊन देशात कायम राहणार आहे. परंतु यात शेती व मत्स्य व्यवसायासोबत शेती व्यवसायाला यातून वगळण्यात आल्याची माहिती होती. परंतु यानंतर सध्या उद्योग मंत्रालयाने कापडनिर्मिती उद्योग, सोने आणि दागिन्यांचा व्यवसाय यासह अन्य 15 उद्योग क्षेत्रांना काम सुरु करण्यासाठीची शिफारस केली आहे. सोबत वेंडर्सला ओळखपत्रासोबत काम करण्याची मंजुरी देण्याचे सुचविले आहे. या उद्योजगतासाठी क्लोथिंग मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन ऑफ इंडिया, बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया, कोस्टल कंटेनर ट्रान्स्पोर्ट असोसिएशन आदीचे मुख्य व अभ्यासक आणि कंफेडरेशन ऑफ ऑल इंडिया टेडर्सचे महासिचव प्रवीण खंडेलवाल यांनी विविध क्षेत्रांवर लॉकडाऊनमधून सवलत मिळाल्यास काय स्थिती राहिल या संबंधीचा व्यक्त केलेला अंदाज पुढीलप्रमाणे.
असंघटीत क्षेत्र
लॉकडाऊनमधील मिळणाऱया थोडय़ाशा सवलतीमधून असंघटीत क्षेत्रात कार्यरत असणाऱया लोकांना लाभ होण्याची शक्मयता आहे. यामुळे देशातील जवळपास 4 ते 5 कोटी लोकांना फळे भाज्या आणि इलेक्ट्रिशियन, मॅकेनिकलचे काम करणाऱयांना थेट लाभ होण्याचे संकेत कंफेडरेशन ऑफ इंडिया टेडर्सचे महासचिव प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले आहे. या क्षेत्रात फळे भाज्यासोबत रस्ते वाहतूक, मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग, कोळसा आणि खाण क्षेत्रासोबत अन्य लहान मोठय़ा उद्योगांचा यामध्ये समावेश आहे.
बांधकाम क्षेत्र
बांधकाम आणि रियल इस्टेट क्षेत्रात संपूर्ण देशात जवळपास 6 कोटीपेक्षा जादा कामगार काम करत असतात. त्यामुळे सध्याच्या बंदमुळे 60 टक्के कामगार साईटवर वा अन्य ठिकाणीच राहिले आहेत. त्यामुळे येथे काही प्रमाणात काम सुरु ठेवण्याची प्रक्रिया करायला हवी. असे बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाचे आनंद गुप्ता यांनी म्हटले आहे. जर सरकारकडून यासाठी मान्यता न मिळाल्यास मजुरांना काम करता पगार देण्यास परवडणार नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या मजुरांसाठी वेतन देण्यासाठी सरकारला प्रयत्न करावा लागेल, असेही स्पष्टीकरण दिले आहे.
वाहन क्षेत्र
सरकारकडून काही प्रमाणात मार्गदर्शक सूचना येण्याचे बाकी आहे, कारण अगोदरच नोटाबंदी, जीएसटी आणि बीएस-6 प्रणालीसह नवीन बदल होणार आहेत. त्यामुळे आर्थिक मंदीच्या संकटामुळे निर्माण झालेली समस्या सुटण्याच्या अगोदरच कोरोनाच्या संकटामुळे वाहन क्षेत्राच्या समस्येत आगामी काळात आणखीन वाढ होण्याची भीती आहे. देश विदेशासोबत जवळपास 15 लाखांहून अधिक जण या क्षेत्रात काम करत असतात. याबाबत वाहन कंपन्या आणि सरकार यांच्यात सकारात्मक चर्चा होत आहेत. त्यामुळे या क्षेत्राला दिलासा मिळण्याचे संकेत व्यक्त होत आहेत.
कोस्टल कंटेनर ट्रान्स्पोर्ट
लॉकडाऊनच्या प्रभावामुळे हा व्यवसाय काहीसा प्रभावीत झाला आहे. त्यामुळे काहीशी यात घसरण झाली आहे, असे कोस्टल कंटेनर ट्रान्स्पोर्ट असोसिएशनचे सदस्य महेश डरे यांनी म्हटले आहे. गुजरातमधील कंटेनर ट्रान्स्पोर्टच्या उलाढालीत जवळपास 60 टक्क्मयांपर्यत घट झाली आहे. यासाठी सरकार या क्षेत्राला बळकटी देण्यासाठी आर्थिक पॅकेज देण्याच्या तयारीत आहे.
सिरॅमिक्स उद्योग
देशातील सर्वात मोठा आणि जगातील तिसऱया नंबरचा मोठा उद्योग सिरॅमिक्स उत्पादनाचे केंद्र गुजरातमध्ये आहे. सध्या लॉकडाऊनमुळे येथील स्थिती अगदी नाजूक झाली आहे. त्यामुळे येथील जवळपास 4 लाख लोक रोजगार सुरु होण्याच्या प्रतिक्षेत आहेत. जर का सरकारकडून या क्षेत्राला सवलत मिळाली आणि लॉकडाऊच्या काळात काम सुरु झाले तर यांची स्थिती सामान्य होण्याचा अंदाज मोरबी सिरॅमिक्स असोसिएशनचे मुख्य नीलेश जेतपरिया यांनी व्यक्त केला आहे. जर या क्षेत्रातील उत्पादन सुरु केल्यास हा उद्योग तेजीत येण्याचे संकेत आहेत.
टेक्स्टाईल आणि गारमेंट :
जर का काम करण्यास मंजुरी मिळाली तरी या क्षेत्रासाठी हा निर्णय दिलासादायक ठरणार असल्याचे मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन इंडियाचे राहूल मेहता यांनी म्हटले आहे. परंतु सर्वात मोठी समस्या ही आहे की हे खरंच सुरु होणार का हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. त्यामुळे लॉकडाऊनने या क्षेत्राच्या समस्येत वाढ केली आहे. हळूहळू का असेना या क्षेत्राची सुरुवात करावयास हवी. कारण जवळपास 1.2 कोटी लोकांचा रोजगार प्रभावीत होण्याची भीती आहे. त्यामुळे सध्या काम सुरु करण्याची परवानगी काही प्रमाणात मिळाली तर फक्त 25 टक्के कामगार वर्ग उपलब्ध होणार असल्याचे राहूल मेहतांनी म्हटले आहे. दुसरीकडे किरकोळ व्यवसाय सुरु झाला तरच हा व्यवसाय सुरु राहणार असल्याचे सांगितले आहे. कारण मागणीच होत नसल्यास नुसते बांधकाम क्षेत्राची सुरूवात करुन काही उपयोग होणार नाही.