मुंबई / ऑनलाईन टीम
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता, राज्य शासनानं बैठकींची सत्र सुरु केली आणि आता शासनाकडून गुढी पाडव्याच्याच दिवशी मोठा निर्णय जाहीर केला जाण्याची चिन्ह आहेत. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी माध्यमांशी संवाद साधताना यासंदर्भातील माहिती दिली.
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सरकार महत्त्वाच्या निर्णयावर पोहोचलं आहे. शिवाय येत्या काळात कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचाचं सर्व अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं अधिक वेळ न दवडता आता अंतिम निर्णय घेतले जाणार असल्याचे संकेत अस्लम शेख यांनी दिले.
विषाणूची साखळी तोडण्याचा प्रयत्न करतोय. लोकांनीही हे समजून घेतलं पाहिजे. एका आठवड्यापासून सरकार प्रयत्न करत आहे . पण कुठेही कमतरता दिसत नाही म्हणून मला असं वाटतंय की, राज्य सरकारचा आज यासंदर्भातील मोठा निर्णय घेणार. लॉकडाउन हा शब्द लोकांच्या मनात भीती निर्माण करतो. कारण रात्री आठ वाजता यायचं आणि लोकांसमोर बोलायचं. लोक मग या मानसिकतेतून बाहेर येत नाही. राज्य सरकारला चेन ब्रेक करायची आहे. लोकांना सोबत घेऊन लोकांचं म्हणणं ऐकून आम्हाला हे करायचं आहे. पुढील काळासाठी चांगल्या गाईडलाईन्स तयार करण्यासाठी आम्ही कामाला लागलो आहोत. मला वाटत आजच यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली.
Previous Articleबेंगळूरमध्ये कोरोना रुग्णांनी बेड फुल्ल
Next Article युक्रेनचे राष्ट्रपती लष्करी गणवेशात सीमेवर








