कापडी मास्क विक्रीतून रोजगाराची निर्मिती
प्रतिनिधी/ सातारा
मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱया कुटुंबावर लॉकडाऊनमध्ये उपासमारीची वेळ आली आहे. रोजगार बंद झाल्याने अनेक कुटुंब आर्थिक संकटात सापडली आहेत. अशाच आर्थिक संकटात सापडलेल्या दिक्षित दाम्पत्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कापडी मास्क तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. सर्व रंगात उपलब्ध असणारे व खिशाला परवडणाऱया या मास्कची मागणी वाढली आहे.
साताऱयातील केसरकर पेठ येथे राहत असलेल्या शिल्पा दीपक दिक्षित खानावळ चालवण्याचा व्यवसाय करत होत्या. मात्र लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद करण्याची वेळ त्यांच्यावर आली. रोजगार बंद झाल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या शिल्पा दिक्षित यांनी कापडी मास्क बनवायला सुरूवात केली. बाजारातील मास्कपेक्षा अत्यंत चांगल्या दर्जाचे कापडी मास्क त्यांनी तयार केले आहेत. याला इल्यग्नास्टिक लावल्याने ते वापरायला सोपे झाले आहे. कापडी मास्क असल्याने यांचा वापर जास्त काळ करता येत आहे. वेगवेगळया रंगाचा वापर करून हे मास्क बनविले आहेत. या एका मास्कची किंमत 20 रूपये आहे. तसेच होलसेलच्या दराने 15 रूपये किंमत आहे. आतापर्यंत त्यांनी 10 हजार मास्क बनवले आहेत. या मास्कची विक्री पती दीपक दिक्षित सायकलवरून फिरवून करत आहेत. यांच्या खरेदीसाठी गर्दी होत आहेत. या मास्कच्या विक्रीतून हे दाम्पत्य कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत.
रोजगार निर्मिती केली…
लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद झाला होता. तरीही मास्क बनवून यांची विक्री सूरू केली. यांचा चांगला फायदा झाला आहे. आर्थिक संकटावर मात करत उदरनिर्वाह सुरू आहे. यामुळे रोजगार निर्मिती झाली आहे. हे मास्क घरपोच देण्याची सोय आहे. त्यासाठी 7498839482 या नंबर संपर्क साधावा असे आवाहन करत आहे.








