सम्राट अशोक चौक ते सर्किट हाऊस मार्गावरील कामे पूर्णत्वाकड
प्रतिनिधी / बेळगाव
लॉकडाऊन काळातही शहरातील स्मार्ट सिटीची कामे सुरू असल्याने सर्वसामान्यांतून समाधान व्यक्त होत आहे. शहरातील सम्राट अशोक चौक ते सर्किट हाऊसपर्यंतच्या मार्गावर असलेल्या गटारीचे काम हाती घेण्यात आले आहे. शहरातील विविध रस्ते, गटारी, डेनेज व इतर भागांचा स्मार्ट सिटीअंतर्गत विकास साधण्यात येत आहे. मात्र गतवषीपासून कोरोनाकाळात या कामाला स्थगिती मिळत आहे. मात्र काही ठिकाणी अशा कठीण काळातदेखील स्मार्ट सिटीची कामे सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. गतवषी कोरोनामुळे स्मार्ट सिटीची कामे ठप्प झाली होती. दरम्यान स्मार्ट सिटीच्या कामासाठी अधिक प्रमाणात परप्रांतीय लोक आहेत. गतवषीदेखील परप्रांतीय मूळगावी परतल्याने स्मार्ट सिटीच्या कामांना बेक लागला होता. यंदा काही परप्रांतीय कामगार स्मार्ट सिटीच्या कामात गुंतल्याचे दिसून येत आहे. सध्या लॉकडाऊनमुळे रस्त्यावरील वाहतूक कमी असल्याने रस्त्याशेजारील स्मार्ट सिटीची कामे करणे सोयीस्कर होत आहे. सम्राट अशोक चौक ते सर्किट हाऊस मार्गावर स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू असलेली कामेदेखील पूर्णत्वाकडे येत आहेत.









