ब्रिटनमध्ये 30 लाख लोकांमुळे 50 हजार रेस्टॉरंट फुल्ल
लोकांनी रिचविली 28 लाख लिटर बिअर
ब्रिटनमध्ये कोरोना संकट आता निवळू लागले आहे. याचमुळे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी लॉकडाउन शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. देशातील पब आणि रेस्टॉरंट आता सुरू होऊ लागले आहेत. लोकांनीही बाहेर पडण्यास प्रारंभ केला आहे. पण सरकारकडून मिळालेली सूट चिंतेचा विषय ठरली आहे. इंग्लंडमध्ये शनिवारी सुपर सॅटर्डे नाइट होती. यांतर्गत एका दिवसात सुमारे 30 लाख लोक हिंडण्यासाठी घराबाहेर पडले. यामुळे इंग्लंडमधील सुमारे 50 हजार बार, पब आणि रेस्टॉरंट फुल्ल झाले.

विशेष बाब म्हणजे या लोकांनी एका दिवसात 6 दशलक्ष पॉइंट्स (28 लाख लिटर) बियर रिचविली आहे. शनिवारी ब्रिटनचे युवराज फिलिप यांच्या अत्यंसंस्काराच्या दिवशी अनेक लोक शोकात बुडालेले असताना हा प्रकार घडला आहे. पण रेस्टॉरंट आणि पब संचालकांनुसार सर्वकाही सुरळीत राहिल्यास लॉकडाउनमधील नुकसानाची भरपाई लवकरच होणार आहे.









