प्रतिनिधी / उंब्रज
दुसाळे ता. पाटण येथील सचिन संभाजी जाधव हे आडतीस वर्षीय जवान लेह-लडाख सिमेवर कर्तव्य बजावत असताना झालेल्या चकमकीत शहीद झाले आहेत.बुधवारी ही घटना घडली असून शनिवारी दुसाळे येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.यासाठी ग्रामस्थ व प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे.आकस्मिक धडकलेल्या बातमीने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून विभागावर शोककळा पसरली आहे.त्यांच्या पाश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.
सचिनचे वडील सुमारे वीस वर्षापूर्वी मेजर सुभेदार पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. सचिन लहानपणापासून हुषार होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण दुसाळे गावात झाले. त्यानंतर सातारा येथे उच्च शिक्षण घेत असतानाच 2002 साली ते पुणे येथे भरती झाले. त्यांनी लेह लडाख,जम्मू काश्मीर, पुणे येथे सेवा बजावून पून्हा लेह लडाख येथे कार्यरत होते. तर लहान भाऊ सुमारे दहा वर्षापूर्वी देशसेवेत रूजू झाला आहे.
सुमारे तीन महिन्यपूर्वी ते दोन महिन्याच्या सुटीवर गावी आले होते. पण एक महिन्यातच त्यांची रजा रद्द करून त्यांना सेवेत हजर रहावे लागले होते. ते सद्ध्या 111 इंजिनियरींग रेजिमेंट मध्ये नाईक पदावर काम करत होते. दरम्यान, सिमेवर गस्त घालत आसताना घूससखोरी करणाऱ्या चीनच्या सैनिकांना आटकाव करताना झालेल्या चकमकीत ते शहीद झाल्याची प्राथमिक माहीती गावकर्यांकडून मिळाली आहे. आहे. बुधवारी ही घटना घडली असून गावात माहिती कळताच घरच्यांनी एकच आक्रोश केला.
या घटनेने कुटुंब दुःखात लोटले आहे. दुसाळे गावासह विभागावर शोककळा पसरली असून शहीद सचिन यांच्या प्रती हळहळ व्यक्त होत आहे. आज सकाळी त्यांचे पार्थिव हेलिकाॕप्टरने श्रीनगरमध्ये आणले जाणार आहे. तेथे मानवंदना देऊन विमानाने पार्थिव दिल्लीत येणार आहे. राञी दहाच्या दरम्यान पुणे येथे पार्थिव येणार असून तेथे मानवंदना दिल्यानंतर उद्या सकाळी सात वाजेपर्यंत पार्थिव दुसाळे येथे येणार आसून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.









