नवी दिल्ली
लेनोवोने भारतात आपल्या लोकप्रिय योगा सिरीजअंतर्गत एआयआधारीत 7 आय हा स्लिम लॅपटॉप नुकताच दाखल केला आहे. या लॅपटॉपची सुरूवातीची किंमत 79 हजार 990 रुपये असणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. योगा स्लिम 7 आय लॅपटॉप स्लेट ग्रे रंगात असून त्याची प्रत्यक्ष विक्री येत्या 20 ऑगस्टपासून लेनोवा डॉट कॉम, ऍमेझॉन, फ्लिपकार्ट आणि ऑफलाइन माध्यमाद्वारे केली जाणार आहे. 15.5 मिमी जाडीचा हा लॅपटॉप 1.36 किलोग्रॅम वजनाचा असणार असून याला जनरल इंटेल कोर आय 7 प्रोसेसर दिला आहे. याची बॅटरीही उत्तम असून विंडोज 10सह 512 जीबी एसएसडी स्टोरेज आणि 16 जीबी पर्यंत मेमरीची सुविधा असेल.









