निपाणीत क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन : मान्यवरांची उपस्थिती
प्रतिनिधी / निपाणी
येथील चॅलेंजर स्पोटर्स क्लब यांच्यावतीने समर्थ व्यायाम शाळेच्या मैदानावर क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यामधील पहिला सामना लेजेंड्स ऑरेंज व येलो लेजेंड्स यांच्यात झाला. यामध्ये लेजेंड्स ऑरेंज संघाने येलो लेजेंड्स संघावर मात करत विजयी सलामी दिली.
स्पर्धेचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांच्या हस्ते करण्यात आले. सदर स्पर्धा लिग पद्धतीने होणार आहे. यामध्ये शहरी व ग्रामीण गटामध्ये होणार असून त्यामध्ये 24 संघांनी नोंदणी केली आहे. पहिल्या सामन्यात लेजंड्स ऑरेंज संघाने प्रथम फलंदाजी करताना 91 धावा काढल्या. दीपक खोत व महादेव कांबळे यांनी प्रत्येकी 24 धावा काढल्या. येलो लेजंड्स संघातील दिलीप घाटगे याने गोलंदाजी करताना 2 बळी घेतले. प्रत्युत्तर देताना येलो संघाने 73 धावा काढल्याने लेझेन्डस ऑरेज संघ विजयी ठरला.
यावेळी डॉ. चंद्रकांत कुरबेट्टी, सोमनाथ शिंदे, सचिन साळुंखे, नगरसेवक विनायक वडे, युवानेते राजेश कदम, अनिस मुल्ला, हर्ष माने, संदीप पुजारी, रोहित सन्नाईक, चंद्रकांत मोरे, अभिजीत सांडुगडे, बंटी कांबळे, चेतन पांगिरे, संतोष कांबळे, योगेश साबळे, समीर मुजावर, विजय कांबळे, सुमित पोवार, यशवंत बरकाळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.









