ऑनलाईन टीम / सोलापूर :
‘आज के शिवाजी : नरेंद्र मोदी’ या वादग्रस्त पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल यांच्यावर सोलापुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवसेनेचे कार्यकर्ते दिनकर जगदाळे यांनी याबाबत सोलापुरातील फौजदारी चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
जयभगवान गोयल यांनी लिहिलेल्या ‘आज के शिवाजी : नरेंद्र मोदी’ या वादग्रस्त पुस्तकाचा देशभरातून निषेध होत आहे. याच पुस्तकावरुन विरोधकांसह सर्वसामान्य जनतेनेही भाजपवर जोरदार टीकेची झोड उठली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. त्यामुळे राजकीय नेत्यांनी या पुस्तकावर बंदी आणण्याची मागणी केली होती. या पुस्तकामुळे शिवाजी महाराजांचा अपमान झाल्याची भावनाही देशभरातून व्यक्त होत असतानाच दिनकर जगदाळे याविरोधात पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल यांच्याविरोधात पोलिसांत धाव घेतली.









