प्रतिनिधी / बेळगाव
लेकव्हय़ू फौंडेशनतर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवारी बेला वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. सदर वॉकेथॉनला 1000 हून अधिक महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वॉकेथॉनचे उद्घाटन कायदा व सुव्यवस्था विभागाच्या डीसीपी यशोदा वंटगुडी यांच्या हस्ते झाले.
लेकव्हय़ू फौंडेशनतर्फे गेल्या तीन वर्षांपासून वॉकेथॉनचे आयोजन करण्यात येत असून रविवारी सकाळी गोवावेस येथील लेकव्हय़ू हॉस्पिटलपासून वॉकेथॉनला प्रारंभ झाला. पुढे गोवावेस, हरिमंदिर, अनगोळ येथून परत हॉस्पिटलमध्ये सांगता करण्यात आली. ‘इच फॉर इक्वल’ अशी थीम असलेल्या वॉकेथॉनला महिलांचा प्रतिसाद लाभला. डॉ. शशिकांत कुलगोड म्हणाले, महिलांचे आरोग्य सदृढ राहावे, महिलांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे, महिला सक्षम व्हाव्यात, या दृष्टिकोनातून वॉकेथॉनचे आयोजन केल्याचे सांगितले. डीसीपी यशोदा वंटगुडी यांनी महिला आज पुरुषांबरोबर कार्यरत असून महिलांनी स्वरक्षणासाठी आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे सांगितले.
याप्रसंगी लेकव्हय़ूचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. के. एस. माने, डॉ. अनिल पाटील, डॉ. प्रभूभूजा बाली, डॉ. प्रभू हालकट्टी, बेलाच्या समन्वयक शीतल चिलमी, डॉ. श्वेता सोनवलकर, डॉ. अनुश्री माने, डॉ. प्रभू राजवाली, पीआरओ गिरीशकुमार व महिला उपस्थित होत्या.