ऑनलाईन टीम / लंडन :
कोरोनाच्या ‘लॅम्बडा’ व्हेरिएंटने जगभरातील 30 देशांमध्ये हजेरी लावली आहे. हा व्हेरिएंट डेल्टापेक्षाही अधिक धोकादायक असल्याचे ब्रिटनच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
लॅम्बडा व्हेरिएंटला सी.37 स्ट्रेन असेही म्हटले जाते. दक्षिण अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीला लागून असलेल्या पेरु या देशात पहिल्यांदा लॅम्बडा व्हेरिएंट आढळून आला. त्यानंतर या व्हेरिएंटने जगभरातील काही देशांमध्ये हातपाय पसरण्यास सुरूवात केली. चार आठडय़ात या व्हेरिएंटने 30 देशात हजेरी लावली आहे. त्यामुळे जगाची चिंता पुन्हा वाढली आहे.
अमेरिकन हेल्थ ऑर्गनायझेशनने म्हटले आहे की, पेरुमध्ये मे आणि जून महिन्यात करण्यात आलेल्या कोरोना चाचण्यांमध्ये 82 टक्के रुग्णांमध्ये लॅम्बडा व्हेरिएंट आढळून आला हेता. याशिवाय चिलीमध्येही मे आणि जूनमधील कोरोनाच्या एकूण प्रकरणांपैकी 31 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाचा लॅम्बडा व्हेरिएंट आढळला.









