वृत्तसंस्था/ मुंबई
मोबाईल व टॅबच्या बाजारात आपला भक्कम वाटा काबीज करणाऱया ऍपलला आता लॅपटॉप व डेस्कटॉप बाजारावर लक्ष केंद्रित करायचं आहे. त्यासंदर्भातली रणनीती कंपनीने आखली असल्याचे कळते.
कंपनीने पहिल्यांदाच आपल्या मॅकबुकसाठी एम 1 चिप तयार केली असून याच्या वापरामुळे सिस्टिमची कामगिरी अधिक गतीमान होते असे कंपनीने म्हटले आहे. ऊर्जा सक्षमता वाढण्यासही याची मदत होणार आहे. एकदा बॅटरी पूर्ण चार्ज केल्यानंतर मॅक बुकवर 20 तासापर्यंत चित्रपट पाहता येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
5 नॅनोमीटरची चीप
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार 5 नॅनोमीटरची चिप तयार केली जात आहे. ही 5 नॅनोमीटर प्रक्रिया तंत्रज्ञानाची पर्सनल कॉम्प्युटरकरिता वापरावयाची पहिली वहिली चिप असणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
सीपीयू अधिक सक्षम
दुसरीकडे ऍपलने येणाऱया काळात अधिक सक्षम असा सीपीयू सादर करण्याचे ठरवले आहे. कोणत्याही लॅपटॉप व डेस्कटॉपची कामगिरी ही त्यातील सीपीयूवर आधारीत असते. 10 वॉटची एम 10 चिप ही कमीत कमी ऊर्जा खर्च करून लॅपटॉपची क्षमता वाढवते. 25 टक्के ऊर्जा बचतीचा फायदा होणार असल्याचा दावा ऍपलने केला आहे..









