उन्हाळा सुरू झाला की कॉटनच्या सैलसर कपडय़ांना प्राधान्य दिलं जातं. मात्र सध्या कॉटनपेक्षाही लिननची क्रेझ आहे. लिननच्या साडय़ा, कुर्ते आणि पँट्सना पसंती दिली जाते आहे. लिननच्या सैल कपडय़ांमुळे उन्हाळ्यात दिलासा तर मिळतोच शिवाय ते स्टायलिशही दिसतात. लिननचे कपडे घालताना काही गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं. त्याविषयी…
- लिननच्या कपडय़ांवर सुरकुत्या पडणं सर्वसामान्य बाब आहे. सध्याच्या काळात आधीच्या तुलनेत मुलायम लिनन उपलब्ध झालं आहे. लिननचे कपडे नेहमीच नवे दिसावेत यासाठी ते धुवून इत्री करून ठेवा. लिननचे कपडे स्टार्च करू नका. लिननवर थोडय़ाफार सुरकुत्या शोभून दिसतात. त्यामुळे थोडे सुरकुतलेले कपडे घालायला हरकत नाही.
- लिननने टी शर्ट आणि शर्टस जीन्स किंवा ट्राउझरवर घालता येतील. स्कर्ट तसंच सैल जॉगर्सवरही हे शर्ट, टी शर्टस कॅरी करता येतील. कॅज्युअल लूकसाठी हा पर्याय उत्तम ठरतो. घरातही असे कपडे घालता येतील. वर्क फ्रॉम होम करत असाल तर अशा पद्धतीने तयार होऊन कामाला बसू शकता. लिनन ड्रेस किंवा वन पीसही छान दिसतात. त्यावर सँडल्स किंवा स्नीकर्स घालता येतील.
- लिननचे बॉक्सी कपडे घालू नका. योग्य साईजचेच कपडे घ्या.
- पाटर्य़ांमध्येही अनेक जणी लिननचे कपडे घालून मिरवताना दिसतात. लिननच्या साडय़ा खूपच सुंदर दिसतात. या साडय़ांवर मॅचिंग ज्वेलरी घातली की झालं काम.
- लिननचे फिकट रंगाचे कपडे घाला. लिननमध्ये पेस्टल, न्यूट्रल शेड्स खूप छान दिसतात.









