संतप्त नेपाळकडून गंभीर आरोप
वृत्तसंस्था/ देहरादून
उत्तराखंडमधील लिपुलेख खिंड क्षेत्रात भारत रस्त्याचे रुंदीकरण करण्याची योजना आखत आहे. परंतु भारताच्या या योजनेमुळे नेपाळमध्ये पुन्हा एकदा नाराजीचे वातावरण आहे. विरोधी पक्ष आणि सत्तारुढ आघाडीच्या पक्षांनी भारताने नेपाळचे सार्वभौमत्व कमी लेखू नये असे म्हटले आहे. नेपाळने यापूर्वी लिपुलेख, लिंपियाधुरा आणि कालापानी क्षेत्रावर स्वतःचा दावा केला होता. तसेच याकरता त्याने एक नवा नकाशाही प्रसिद्ध केला होता.
भारत सरकारच्या रस्ता रुंदीकरणाच्या योजनेवर नेपाळमधील आघाडी सरकार मौन बाळगून आहे. तर देशातील मुख्य सत्तारुढ पक्ष नेपाळी काँग्रेसने रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा भारताचा निर्णय आक्षेपार्ह असल्याचे म्हटले आहे.
चीनसोबत लागून असलेल्या ट्राय-जंक्शननजीक लिपुलेख खिंडीसाठी रस्त्याच्या निर्मितीने दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये पुन्हा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. केवळ कैलास मानसरोवर यात्रेच्या भाविकांकडून वापर केल्या जाण्यापूर्वीच हा रस्ता तेथे आहे. नव्या प्रकल्पाच्या अंतर्गत भाविक, स्थानिक लोक आणि व्यापाऱयांच्या सुविधेसाठी याच रस्त्याला चालण्यायोग्य करण्यात आले आहे. नेपाळकडून उत्तराखंडमधील लिपुलेख आणि कालापानी क्षेत्रावर दावा केला जातो. तर हे क्षेत्र भारताच्या प्रशासकीय नियंत्रणात आहे.









