मेरी कॉम चित्रपटातील अभिनेत्री
अभिनेता रणदीप हुडा हा मेरी कॉम या चित्रपटातील अभिनेत्री लिन लॅशरामला डेट करत असल्याची चर्चा आहे. मणिपूरची रहिवासी लिन लॅशराम एक यशस्वी मॉडेल असून तिने ‘रंगून’, ‘ओम शांति ओम’ यासारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

रणदीप हुड्डा आणि लिन हे लिव्ह-इनमध्ये राहत आहेत की नाही हे अद्याप समोर आलेले नाही. दोघांपैकी कुणीच यासंबंधी बोलण्यास तयार नाही. रणदीपच्या जीवनात लिनला विशेष स्थान असल्याचे त्याच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे. रणदीप आणि लिन हे परस्परांना सुमारे 8 महिन्यांपासून डेट करत आहेत. लिनने काही महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक छायाचित्र शेअर केले होते, ज्यात ती रणदीपसोबत दिसून आली होती.
लिनपूर्वी रणदीप हुडा हा सुमारे 3 वर्षांपर्यंत नीतू चंद्राला डेट करत होता. रणदीप हुडा स्वतःचे अनेक चित्रपट हायवे, सरबजीत, किक, जन्नत 2, जिस्म 2 यासारख्या चित्रपटांमुळे चर्चेत राहिला आहे. रणदीपला अलिकडेच एका शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले आहे.









