वार्ताहर /पालये
लिंगेश्वर पालये या पेडणे तालुक्मयातील नाटय़,कला,क्रीडा,शिक्षण अशा विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थेच्या सदस्यांनी यंदाची आपली पदभ्रमण व इतिहास विषयक अभ्यास मोहीम हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या महाराष्ट्राच्या रायगड जिह्यातील सह्याद्रीच्या पर्वत रांगातील महत्त्वाचा असा किल्ले रायगड सर करून पार पाडली. यावेळी त्यांनी पायी चालत गड सर करून संपूर्ण गडावरील भग्ना अवस्थेतील विविध इतिहास कालीन वास्तूंचे अवशेष पाहून त्यांची ऐतिहासिक माहिती जाणून घेतली.
रविवारी सकाळी नऊच्या दरम्यान गडाच्या पायथ्याशी पोहोचल्यावर तिथून पायी चालत गड चढण्यास सुरुवात झाली. “छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय “अशा घोषणा देत व हातात भगवा ध्वज घेवून या सदस्यांनी दीड ते पावणे दोन तासात गडाच्या साधारण 1400 हून अधिक असलेल्या पायऱया चढून समुद्र सपाटी पासून सुमारे 820 मीटर म्हणजे 2700 फूट उंच असलेल्या स्वराज्याच्या राजधानीचा व शिवाजी महाराजांच्या प्रमुख गडापैकी एक असलेला किल्ले रायगड सर केला. चित्त दरवाजातून पुढे जात महाद्वारातून प्रवेश करीत प्रथम उजव्या बाजूला असलेल्या देवी शिरकाईचे दर्शन घेतले.
त्यानंतर होळीमाळावर येत तेथील स्थापन केलेल्या सिंहासनावर विराजमान झालेली भव्य अशा शिवरायांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले व डावीकडे जात नगारखान्याच्या भव्य प्रवेश द्वारातून भव्य अशा 120 फूट लांब व 124 फूट रुंद अशा जिथे महाराजांचा ’न भूतो न भविष्य ती’ असा जो स्वराज्याने त्या काळात महारांचा राज्याभिषेक अनुभवला होता त्या राज्याभिषेकाची जागा म्हणजे राजदरबारात प्रवेश केला. तिथून समोरच महाराजांच्या सिंहासनाच्या स्थानाचे दर्शन घेतले. त्याच्या मागील बाजूस महाराजांचे अष्टप्रधान मंत्री मंडळ त्यांच्या कार्यालयाची, न्याय निवाडा करण्याचे काम पाहाण्याचे म्हणजे सचीवालयाचे स्थान पाहिल्यावर महाराजांचा राजवाडय़ाचे ठिकाण जिथे महाराजांनी अखेरचा श्वास घेतला, त्यांचे जिथे महानिर्वाण झाले ते स्थान ,राजमहाल, त्याची अंतर्गत रचना, राणीवशांची विविध दालने, त्यांची अंतर्गत खोली रचना, दासी महाल, मुद्रा बनविण्याची जागा म्हणजे टाकसाळ खोली, मेणा दरवाजा, रायगडाच्या स्थापत्य रचनेचे आजही भव्यता सांगणारे परंतु भग्ना अवस्थेतील नक्षीदार उंच मनोरे, (स्त?भ), तसेच लागून असलेले टेहाळणी बुरुज, तिथूनच खाली नजरेत येणारे व कधीच कोरडे न पडणारा गंगासागर तलाव, गुप्त हेर किंवा महत्त्वाची चर्चा करण्याचे ठिकाण असलेला खलबत खाना, दुसऱया बाजूला असलेल्या धान्याच्या कोठारांची जागा,तिथूनच खाली असलेला बाले किल्ला पाहून हे सदस्य मग पुन्हा नगारखान्याच्या दरवाजातून बाहेर पडून जगदीश्वर मंदीराच्या दिशेने निघाले. वाटेत मध्यभागी रस्ता व दुतर्फा असलेली दुकानाच्या रांगांचे भव्य अवशेष त्यावेळच्या बाजार पेठेची साक्ष देतात.पुढे गेल्यावर उत्तरेस असलेल्या स्वराज्याच्या गुन्हेगारांना शिक्षा देण्याचे स्थान म्हणजे टकमक टोक दृष्टीस येते.बाजूच्या रस्त्याने पुढे मग जगदीश्व्ा्रराचे जुन्या धाटणीचे मंदीर दिसते त्याच्या समोरच छत्रपती शिवरायांच्या भव्य अशा समाधी स्थळाचे दर्शन घेवून नंतर सारे परतीच्या वाटेकडे निघाले. नव्याने उत्खननात सापडलेली भग्ना अवस्थेतील महालांचे अवशेष पाहात सारी मंडळी गड उतार झाली.
पूर्ण किल्ल्या वरील हिरोजी इंदुलकर यांच्या स्थापत्यकला रचनेतून निर्माण झालेली वेगवेगळी दालने, बुरुज,स्त?भ, द्वार, कोठारे, मंदिरे, त्यांच्या रचनांचे नमुने व त्यांचे ऐतिहासिक महत्त्व जाणून घेत व इतिहासातील पाने उलघडवून महान राजाच्या पराक्रमाचे गोडवे सांगणाऱया किल्ल्याचे दर्शन घेऊन शिव सामर्थ्याच्या गाथेने, भारावलेले हे युवक दुपारी दोन वाजता घोषणा देत परतीच्या वाटेकडे निघाले. गड उतरताना त्यांनी रोप वे चा थरारक अनुभवही घेतला.









