झी युवा वाहिनीवरच्या लाव रे तो व्हिडिओ या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातलं टॅलेंट पहायला मिळतंय. कारण कार्यक्रमाची संकल्पनाच तशी आहे, सर्वसामान्य कलाकार किंवा माणसांनी त्यांच्याकडचं कौशल्य किंवा त्यांना अवगत असलेली कला कुसर एका व्हिडिओ माध्यमातून शुट करतात आणि तो व्हिडिओ या कार्यक्रमामध्ये पाठवतात आणि त्या व्हिडिओंना या कार्यक्रमामध्ये दाखवलं जातंय. देशभरातल्या लॉकडाऊनमुळे घरातल्या घरात अशा पद्धतीचे व्हिडिओज शुट करुन एका लोकप्रिय वाहिनीवर झळकण्याची ही संधी अनेक जण घेतायत. या कार्यक्रमाच्या संकल्पनेमुळे प्रेक्षकच नाही तर कलाकारांचा देखील लाव रे तो व्हिडिओ हा आवडता कार्यक्रम ठरतोय आणि म्हणूनच प्रेक्षकांना कलाकारांचे मनोरंजक व्हिडीओज पाहायला मिळणार आहेत.
यामध्ये प्रेक्षकांची लाडकी शनाया म्हणजेच रसिक सुनील प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी एक छान गाणं गाणार आहे. ज्यांच्या कवितांनी संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावेल आहे असे रामदास आठवले त्यांच्या लॉकडाऊनमध्ये लिहिलेल्या कविता प्रेक्षकांसाठी सादर करणार आहेत. महाराष्ट्राची आई सिंधुताई सकपाळ यांनी डॉ. निलेश साबळे याचा सगळ्यांना हसवण्याचा त्याच्या अविरत प्रयत्नांसाठी त्याचं खूप कौतुक केलं. हास्यसम्राट सुनील पाल याचा प्रेक्षकांना हसवण्यात हातखंडाच आहे. सुनील पाल वेगवेगळ्या लोकांची मिमिक्री करून प्रेक्षकांना हसवण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होणार आहे. यांच्या सोबतच हास्यसम्राट राजू श्रीवास्तव, सुप्रसिद्ध गायक नंदेश उमप आणि संगीतकार रोहन रोहन यांचे व्हिडिओज देखील प्रेक्षकांना या आठवडय़ात पाहायला मिळतील. इतकंच नव्हे तर बॉलिवूडच्या कलाकारांना आपल्या तालावर नाचवणारा सुप्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूजा देखील या कार्यक्रमाला चार चांद लावणार आहे. लाव रे तो व्हिडिओ बुधवारी रात्री 9.30 वाजता फक्त झी युवावर प्रसारित होतो.









