दिल्लीत 26 जानेवारीला शेतकर्यांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान लाल किल्ल्यावर उसळलेल्या हिंसाचार प्रकरणातील आणखी एका मुख्य आरोपीला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.
महिंदर उर्फ मोनी (वय 30) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो दिल्लीतील स्वरुपनगर येथील रहिवासी आहे. त्याला पितमपुरा बसस्थानकाजवळ दिuली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. त्याच्या घराची झडती घेत पोलिसांनी दोन तलवारीही जप्त केल्या आहेत. पोलिसांकडील हिंसाचाराच्या व्हिडिओत तो तलवारी नाचवताना दिसत आहे. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी यापूर्वी अभिनेता दीप सिद्धूलाही अटक केली आहे.