ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
लाल किल्ल्यावरील हिंसाचारातील आणखी एक आरोपी इक्बाल सिंग याला पंजाबमधील होशियारपूर येथून अटक करण्यात आली आहे. विशेष सेलच्या पथकाने मंगळवारी रात्री उशिरा त्याला अटक केली. 26 जानेवारी रोजी लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारात सहभागी असल्याच्या आरोपावरून फरार इक्बालवर 50 हजार रुपयांचे बक्षीस दिल्ली पोलिसांनी ठेवले होते.









