ऑनलाईन टीम / लखनऊ :
भारतीय स्वातंत्र्य चळवळीत लाल-बाल-पाल या त्रयींचा आदरपूर्वक उल्लेख केला जातो. या त्रयीतील लाला लजपतराय यांची आज जयंती होती. यावेळी सोशल मीडियावर अनेकांनी त्यांना आदरांजली वाहिली.
भारतीय स्वातंत्र्य लढय़ात महत्त्वाचे योगदान असणाऱया लाला लजपतराय यांच्या जयंतीनिमित्त केलेल्या ट्विटवरून भाजप नेते व उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री सोशल मीडियावर ट्रोल झाले.
उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री आणि भाजप नेते सिद्धार्थनाथ सिंह यांनीदेखील लाला लजपतराय यांना आदरांजली वाहिली. मात्र, त्यांनी या ट्विटसोबत चक्क लोकमान्य टिळक यांचा फोटो लावला.
या ट्विटमुळे अनेक नेटिझन्सनी त्यांची फिरकी घेण्यास सुरुवात केली. काही वेळेतच त्यांचे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर हे ट्विट सिद्धार्थनाथ सिंह यांनी डिलीट केले. मात्र, त्यानंतर सुधारित ट्विट करताना फोटो टाकण्याचे टाळले आहे.









