- मसीना रुग्णालयातील 4 जणांची प्रकृती गंभीर
ऑनलाईन टीम / मुंबई :
लालबागमध्ये रविवारी सकाळी घरगुती गॅस सीलेंडरचा भीषण स्फाेट झालेल्या दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला असल्याचे केईएम रुग्णालय अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले.
यातील 62 वर्षीय सुशीला बंगेरा यांचा मृत्यू रविवारी रात्री उशीरा झाला. तर जखमी करीम (50) यांचा मृत्यू साेमवारी दुपारी झाला असल्याचे केईएम रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
याशिवाय पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर तीन जण किरकाेळ भाजले हाेते. दाेन जणांना साेमवारी दुपारी घरी साेडण्यात आले. पाच जणांची प्रकृती स्थिर असल्याचे केईएम रुग्णालय प्रशासनाने सांगितले. तर मसीना रुग्णालयात उपचार घेत असलेल्या चार जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.