नवी दिल्ली : संरक्षण क्षेत्रासह अन्य महत्वाच्या ठिकाणी वापरण्यात येणाऱया साहित्यांची व प्रकल्पांची निर्मिती करणारी इंजिनिअरिंग क्षेत्रातील दिग्गज कंपनी लार्सन ऍण्ड टुब्रोला (एल ऍण्ड टी) देशातील बाजारातून विविध कामांकरीता कंत्राटे मिळाली आहेत. परंतु किती रुपयांची कंत्राटे मिळाली आहेत याबाबत कंपनीने स्पष्टीकरण दिलेले नाही. भारतीय शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार मोठय़ा वर्गातील जवळपास 2,500 कोटींपासून ते पाच हजार कोटी रुपयापर्यंतचे कंत्राट कंपनीला मिळाले असल्याची माहिती आहे. यासोबतच भवन आणि कारखान्यांच्या शाखांसह मुंबईमधील कार्यालयातील एक निवासी प्रकल्पाच्या योजनेचे कंत्राट मिळाले आहे.
यासोबतच ओडिसातील चार हजार टन प्रति दिन क्षमता असणाऱया क्लिंकर प्रकल्पाच्या निर्मितीचे काम आणि याच धर्तीवर एलऍण्डटीला आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडूमधील प्रकल्पांमध्येही अतिरिक्त कंत्राट मिळाले असल्याचे सांगण्यात येते.









