ऑंनलाईन टीम / नवी दिल्ली
भारताच्या अंतर्गत कारभारावर टीका करणे आणि आक्षेपार्ह भाष्य करत भारतावर निशाणा साधणे हा पाकिस्तानचा जुनाच फंडा आहे. हाच फंडा वापरत पाकने भारताला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. जगातील सर्वात महत्वाच्या मंचांपैकी एक असणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या मंचवर भारताला कश्मिरच्या धोरणावर पाकिस्थानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भाष्य केले. यावर भारताने उत्तर देण्याच्या अधिकारात पाकला प्रत्युत्तर देत लादेनला शहीद म्हणणारा देश म्हणजे पाकिस्तान शाब्दिक हल्ला चढवला.
यावेळी भारताने पाकला दहशतवाद्यांना पाठीशी घालत असल्याचे सांगत पुन्हा एकदा अधोरेखित केले. पाकिस्तान दहशतवादाच्या मुद्यावरुन लक्ष विचलीत करण्यासाठी हा प्रयत्न करत आहे. यापुर्वी ही बऱ्याचदा असा प्रयत्न पाकने केला असल्याचे ही भारताने यावेळी सांगितले. दहशतवाद्यांना आश्रय देण्याच्या मुद्द्यावरुन लक्ष्य विचलीत करण्यासाठी केले जाणारे हे प्रयत्न आहेत,” अशा तिखट शब्दांमध्ये भारताने पाकिस्तानला सुनावलं आहे. इतकचं नाही तर पाकिस्तानचा उल्लेख ‘ओसामा बिन लादेनला शहीद म्हणणाऱ्यांनी’ असा करत भारताने शेजारचा देश दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचं सांगतानाच काश्मीर प्रश्नात पाकिस्तानने पडू नये असा थेट इशारा दिलाय.
“संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या अनेकांना आश्रय देण्यामध्ये पाकिस्तान आघाडीवर आहे. ओसामा बिन लादेनला पाकिस्ताननेच आश्रय दिला. आजही पाकिस्तानचे नेतृत्व त्याचा उल्लेख शहीद असा करतं,” असा टोला भारताची बाजू मांडताना भारताच्या पहिल्या महिला सचिव स्नेहा दुबे यांनी पाकिस्तानला लगावला.








