प्रतिनिधी / लातूर
लातूर शहरात दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णात वाढ होत असल्याने महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी तातडीची बैठक घेऊन येणाऱ्या काळात लातूर शहर कडकडीत बंद करण्यासाठी उपाययोजना कराव्यात यासाठी जिल्हाधिकारी यांना एका पत्राद्वारे निवेदन दिले. दिलेले निवेदन समाज माध्यमातून व्हायरल झाल्याने लातूर शहर बंद होणार अशी चर्चा सुरू झाली त्यात जिल्हाधिकारी यांनी अफवा वर विश्वास ठेवु नका संपुर्ण व्यवहार सुरळीत पणे सुरू राहणार आहेत.
अशी बातमीच माहिती अधिकारी यांच्या मार्फत पाठविण्यात आली तसा मेसेज ही समाज माध्यमातून सुरू झाला महापौरांच लॉकडाउनला समर्थन तर जिल्हाधिकारी यांचा विरोध असा मेसेज गेल्यानं लातुरात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले महापौर यांचे समर्थन तर जिल्हाधिकारी यांचा विरोध यामुळे महापौर व जिल्हाधिकारी यांच्यात मतभेद असल्याचे चर्चिले जात आहे यासर्व घडामोडी त मात्र पालकमंत्री यांची भुमिका काय हे मात्र समजु शकले का ? त्यांना लातूरकरांच्या आरोग्य चे काही देणे घेणे नाही अशी चर्चा सुरू आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








