प्रतिनिधी / लातूर
देवणी तालुक्यातील शिवारात एका शेतात बालाजी बनसोडे वय वर्ष 35 बिहारीपुर ता. मुखेड जि. नांदेड येथील यांचा डोक्यात दगड घालून अज्ञात आरोपीने खुन केला होता. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी त्याच्याजवळील ओळखपत्र, मोबाईल, व इतर कागदपत्रे तसेच चालवित असलेली महिंद्र पिकअप चोरीला घेवून गेले. या गुन्ह्याच्या विरोधात देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीसांना अज्ञात व्यक्तीला शोधून काढण्याचे आव्हान होते. लातूर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या टिमने जिल्हा अधिक्षक निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हा उघडकीस आणण्याचा प्रयत्न सुरू होता. 21 दिवसाच्या अथक परिश्रमानंतर गुन्हे शाखेला या घटनेतील आरोपीला अटक करण्यात यश मिळाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, देवणी तालुक्यातील पोलीस ठाण्या अंतर्गत बालाजी बनसोडे या वाहनचालकांचा खुन करून त्याच्या जवळील कागदपत्रे घेवून पसार झालेल्या आरोपीचा शोध लावण्याचे पोलीसांसमोर आवाहान होते. वेगवेगळी पथके नेमूनही आरोपीचा शोध लागत नव्हता. स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय व इतर माहितीच्या आधारे गुन्ह्यातील संशयीत आरोपीला अटक मिळविण्यात यश आले असून विकास रघुनाथ सुर्यवंशी वय वर्ष 29 रा. हेळंब, ज्ञानेश्वर भारत बोरसुरे वय 21 मौजे हेळंब ता.देवणी येथून ताब्यात घेण्यात आले. अधिक चौकशी केली असता आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली. उदगीर रोडवर वाहन आडवे उभे करून वाहनचालक बालाजी शेषेराव बनसोडे याच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केले व तो मरण पावला. त्यास उचलून नेवून शेताच्या बांधाच्या बाजुला टाकले. व खिशातील मोबाईल फोन, पाकीट व मोबाईल फोन घेवून पसार झाले होते.
सदर गुन्हा उघडकीस करण्यासाठी लातूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे, देवणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कामटेवाड, पोलीस निरीक्षक सुधीर सुर्यवंशी, सहाय्यक फौजदार संजय भोसले, पोलीस अंमलदार राजेंद्र टेंकाळे, रामहरी भोसले, राहुल सोनकांबळे, सदानंद योगी, योगेश गायकवाड, सचिन धारेकर तसेच सायबर गुन्हे शोखेचे पोलीस निरीक्षक सुरज गायकवाड, पोलीस हवालदार संतोष देवडे, राजेश कंचे, प्रदीप स्वामी आदिंनी परिश्रम घेवून गुन्हेगाराला देवणी पोलीस ठाण्याच्या हवाली केले असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कामटेवाड हे करत आहेत.