प्रतिनिधी / लातूर
उदगीर येथील महावितरणचे उपकार्यकारी अभियंता यांनी डीडीएफ योजनेंतर्गत डीपीवरून कनेक्शनची मागणीच्या प्रस्तावासाठी स्वाक्षरी करण्यासाठी व प्रस्ताव मंजुरीला पाठविण्यासाठी उपकार्यकारी अभियंता गुरूप्रसाद विनायक कोसगी वय 47 वर्ष यांनी 5 हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराने लाच देण्यास नकार देवून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
तक्रारीची चौकशी केली असता उपकार्यकारी अभियंता हे पाच हजार रूपयांची रोख लाच घेतांना पंचासमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्या विरोधात उदगीर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक कुमार दराडे लाचलूचपत प्रतिबंधक विभाग, लातूर हे करीत असून हि कार्यवाही श्रीमती कल्पना बारवकर पोलीस अधिक्षक लाचलूचपत विभाग परिक्षेत्र नांदेड, श्रीमती अर्चना पाटील अप्पर पोलीस अधिक्षक नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक्षक माणिक बेद्रे, पोलीस निरीक्षक कुमार दराडे, पोलीस निरीक्षक बाबासाहेब काकडे, पोलीस हेडकॉन्सटेबल संजय पस्तापुरे, रमाकांत चाटे, लक्ष्मीकांत देशमुख, पोलीस नायक चंद्रकांत डांगे, मोहन सुरवसे, महिला पोलीस नायक शिवकांता शेळके, संतोष गिरी, शिवशंकर कच्छवे, आशिष क्षिरसागर, अमोल शिंदे, संदीप जाधव, दिपक कलवले, महिला पोलीस रुपाली भोसले, चालक पोलीस राजीव महाजन आदिंनी पार पाडले.