आरोपीने नशेतून केली हत्या
प्रतिनिधी / लातूर
लातूर शहरात काल सायंकाळी झालेली हत्या ही गुन्हेगारी प्रवृत्तीतून झाली आहे. या घटनेतील मृत्यू पावलेल्या गोकुळ मंत्री याचीही पार्श्वभुमी गुन्हेगारीवृत्तीची होती. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. या घटनेतील आरोपी हे कमी वयाचे असुन आरोपींनी नशापान करून हत्या केली असावी. या हत्त्येमागील हेतुसंदर्भात पोलीस शोध घेत आहेत. लवकरच गुन्ह्याची उकल होईल अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे यांनी दिली.
लातूर शहरात काल घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. या घटनेतील आरोपीला अटक करण्यात पोलीसांना तात्काळ यश आले. या घटनेतील प्रसाद विठ्ठल शिंदे व कौस्तुभ संजय कांबळे या दोघांनाही अटक करण्यात आले आहे. या दोघांनीही नशेतून हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. प्राथमिक माहिती तपासात येत असली तरी आरोपी हे शिक्षीत असल्याची माहिती आहे. या घटनेमागे लातूरातील गुन्हेगारी प्रवृत्तीची टोळी कार्यरत असल्याचे दिसून येते. या घटनेत मृत्यू झालेला गोकुळ मंत्री हा या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळीचा सुत्रधार असल्याचे समजते. शहरातील महाविद्यालयीन शिक्षण घेणार्या अनेक युवकांना नशेचे व्यसन लागले आहे. नशेच्या व्यसनाच्या आहारी गेलेल्या या दोघांनी नशेतुन उत्तेजीत होवुन हत्या केली असावी असा संशय व्यक्त होत आहे. परंतू या घटनेतील खरी माहिती चौकशीअंतीच निषपन्न होईल असे पोलीसांकडुन सांगीतले जात आहे.
आर्थिक लुबाडणुक करणार्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश
लातूर शहरात गुन्हेगारीसोबतच आर्थिक फसवणुक करून लुबाडणार्या टोळीचाही लातूर पोलीसांनी पर्दाफाश केला आहे. जवळपास 100 कोटी रूपयांचे कर्ज मिळवुन देण्यासाठी दलालामार्फत झालेल्या व्यवहाराची फसवणुक झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर यातील आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात लातूर पोलीसांना यश आले आहे. टॉकींग फायनान्सच्या नावाखाली हा व्यवहार झाल्याची माहिती निष्पन्न झाली असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी जितेंद्र जगदाळे यांनी यावेळी दिली. लातूर येथील व्यापारी धनराज पल्लोड यांना आपल्या व्यवसायासाठी 100 कोट रूपयांच्या कर्जाची गरज होती. हे कर्ज खाजगी सावकारीच्या माध्यमातून मिळवुन देण्यासाठी ओळखीतून आर्थिक देवाणघेवाणीचा व्यवहार झाला होता. दलालामार्फत झालेल्या व्यवहारातून कर्ज मिळविण्यासाठी 3 कोटी रूपयांची कमीशन देण्याचे ठरले होते.
त्यापैकी 1 कोटी 52 लाख रूपयांची रक्कम बँकेच्या माध्यमातून आरटीजीएसच्या स्वरूपात करण्यात आली होती. परंतू रक्कम देवुनही कर्ज देण्यास टाळाटाळ होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर व्यापारी धनराज पल्लोड यांना आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून वसुली करण्याचा प्रयत्न केला परंतू कांही उपयोग झाला नाही. झालेल्या फसवणूकीची तक्रार लातूर पोलीस स्टेशनमध्ये एक वर्षापुर्वी केली होती. त्यातील पाचही आरोपींना अटक करून सर्वच्या सर्व रक्कम परत मिळविण्यात लातूर पोलीसांना यश आले आहे.
हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आरोपी हे आंतरराज्यीय लुबाडणुक करणार्या टोळीचे सुत्रधार असल्याचे निष्पन्न झाले आहे. या पाच आरोपींची नावे आर.के.रामन्न उर्फ ईश्वर, आदित्य राम उर्फ ईश्वर रामहरिप्रसाद, जीना कादरी उर्फ सुलतान, नृसिंहराम भोज उर्फ विनोद, व्ही.एम.मोहम्मदखाँन हा या टोळीचा मुख्य सुत्रधार असुन याला पुणे येथील खडकवासला पोलीस स्टेशन येथून यापुर्वीच अटक झाली आहे. हे सर्व आरोपी वॉलीवुड टाईप अशी एक कॉलीवुड म्हणून ओळखली जातात. यातील सहावा आरोपी महमदअलीखाँन हाही यातील या टोळीचा सुत्रधार असुन या घटनेतील संपूर्ण रक्कम जमा रक्कम फिर्यादीला परत मिळाली आहे. यात लातूर पोलीसांनी महत्वपुर्ण कामगिरी बजावली आहे.
व्यापार्यांनी आर्थिक लोभासाठी अशा प्रकारच्या कोणत्याही गुन्हेगारी वृत्ती असलेल्या व्यक्तीशी व्यवहार करू नये असे पोलीसांनी आवाहन केले आहे. या घटनेतील आरोपी अतिशय उच्चभु्र राहणीमान असणारे आहे. या घटनेचा तपास चालु असुन आणखी कांही घटना उघडकीस येतात का याबाबत तपास चालू आहे.









