ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
सीबीआयने दिल्ली सचिवालयाचे अधिकारी गोपाल कृष्ण माधव यांना जीएसटी संबंधीत दोन लाख रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी अटक केली आहे.
गोपाल कृष्ण माधव हे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांचे विशेष अधिकारी (ओएसडी) असल्याचे समजते. गोपाल कृष्ण माधव हे 2015 पासून मनिष सिसोदिया यांच्या कार्यालयात काम करत आहेत.
दरम्यान, या प्रकरणी मनीष सिसोदिया यांनी गोपाल कृष्ण माधव यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
यांसदर्भात मनिष सिसोदिया यांनी ट्विट केले आहे. सिसोदिया म्हणाले, सीबीआईने एका अधिकाऱया लाच घेताना पकडले आहे. हा अधिकारी माझ्या ऑफिसमध्ये ओएसडी म्हणून कार्यरत होता. सीबीआयने त्याला तत्काळ शिक्षा द्यायला हवी.’
गोपाल कृष्ण माधव यांना तत्काळ शिक्षा व्हावी. गेल्या 5 वर्षांत अशा अनेक भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना मी स्वत: पकडले आहे.