गौरी आवळे / सातारा :
सरकारी कार्यालयात खाबुगीरीला आळा बसवण्यासाठी लाचलुचपत विभागाने धडक कारवाई करत गेल्या तीन वर्षात वर्ग 1 ते 4 मधील लाचखोरांना अटक केली आहे. यामध्ये सर्वाधिक कारवाया वर्ग 3 मध्ये झाल्या असून तीन वर्षात 56 जणांना लाच मागणी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक अशोक शिर्के यांनी दिली.
गडगंज पगार असूनही सर्वसामान्य लोकांची सरकारी कामे मार्गी लावण्यासाठी काही अधिकारी, कर्मचारी लाचेची मागणी करत असतात. यामुळे सरकारी कार्यालयात खाबुगीरीचे अनेक प्रकार नेहमीच उघडकीस येतात. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अशा खाबुगीरीला आळा बसवण्यासाठी नेहमीच ठोस पावले उचलली आहेत. तक्रार दाखल होताच, संबंधित व्यक्ती कोणत्या वर्गात कार्यरत आहे, त्यांने किती रूपयांची लाच मागितली आहे. लाच स्विकारण्याचे ठिकाण यांची माहिती मिळताच सापळा रचून संबंधित व्यक्तीला पकडण्यात येते. गेल्या तीन वर्षात लाचलुचपत विभागाने 56 कारवाया केल्या आहेत. वर्ग 1 ते 4 मध्ये सन 2019 मध्ये वर्ग 3 च्या 26 कारवाया, सन 2020 मध्ये 20 करवाया, सन 2021 मध्ये 10 करवाया झाल्या आहेत. अशा एकून तीन वर्षात 56 करवाया झाल्या आहेत. सरकारीनंतर खासगी क्षेत्रातील कर्मचाऱयांना लाच स्कारताना पकडण्यात आले आहे. यामध्ये सन 2019 मध्ये 6, सन 2020 मध्ये 7, सन 2021 मध्ये 3 जणांवर कारवाया झाल्या आहेत.
लाच मागणीत महिलांचे प्रमाण कमी
सरकारी, खासगी कार्यालयात लाच मागण्यात महिला ही पुढाकार घेताना दिसत आहेत. इतर जिह्याच्या तुलनेत सातारा जिह्यात महिला अधिकारी, कर्मचाऱयांचे लाच मागण्याचे प्रमाण 1 ते 2 टक्के इतके आहे. यामुळे जिह्यातील पुरूष अधिकारी खाबुगीरीला जास्त वाव देत असल्याचे गेल्या तीन वर्षाच्या आकडेवारीवरून समोर येत आहे.
सन 2019 ते 2021 या तीन वर्षातील लाचलुचपत विभाग कारवाई आकडेवारी










