पेडणे / प्रतिनिधी
हळर्ण पेडणे येथे राघोजी मनोहर नाईक यांच्या लाकडे ठेवलेल्या मांगराला मंगळवारी दुपारी आग लागून या आगीत सर्व लाकडे व मांगराची जाळून खाक होऊन सुमारे 90 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती पेडणे अग्निशमक दलाचे अधिकारी दिलीप गावस यांनी दिली.
पेडणे अग्निशमन दलाला माहिती मिळताच माहिती मिळताच पेडणे अग्निशमक दलाचे अधिकारी दिलीप गावस, विठ्ठल गावस, मनोज साळगावकर, अविनाश नाईक यांनी घटनास्थळी जाऊन आग विझविली.माञ त्यापूर्वीच या आगीत सर्व लाकडे व मांगर जळून खाक झाला.









