उमेश गंगणे उत्कृष्ट पोझर
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
हिंडलगा येथे हनुमान स्पोर्टस् क्लब व बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना यांच्या विद्यमाने हिंडलगा श्री जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत लाईफटाईम जिमचा विशाल चव्हाण याने हिंडलगा श्री हा मानाचा किताब पटकाविला तर उमेश गंगणे याने उत्कृष्ट पोझरचा किताब पटकाविला.
हिंडलगा बॉक्साईट रोड येथे आयोजित केलेली शरीरसौष्ठव स्पर्धा आयबीबीएफच्या नियमानुसार विविध वजनी गटात घेण्यात आली. निकाल पुढीलप्रमाणे ः 55 किलो वजन गट-1) आकाश निंगराणी (पॉलीहैड्रॉन जिम), 2) मंथन धामणेकर (फिटनेस जिम), 3) जोतिबा बिर्जे (भवानी जिम), 4) गजानन गावडे (बी स्ट्राँग) 5) राजकुमार दोरगुडे (आयुर), 60 किलाs वजन गट-1) उमेश गंगणे (एसएस फौंडेशन), 2) वेंकटेश ताशिलदार (आयुर), 3) आकाश साळुंखे (रायल निपाणी), 4) राजा गडकरी (चामराज), 5) बसवराज सदलगे (हारूगेरी), 65 किलो वजन गट-1) आकाश रावळ (एसएस फौंडेशन), 2) आदित्य काटकर (रूद्र), 3) शिवकुमार पाटील (बी स्ट्राँग), 4) ओमकार गौडर (पॉलीहैड्रॉन), 5) शुभम पाटील (आयुर)
70 किलो-1) महेश गवळी (रूद्रा), 2) सुनील पाटील (हारूगेरी), 3) अनिल भातकांडे (एक्स्ट्रीम), 4) संदीप पावले (मॉडर्न) 5) संकेत सुरूतेकर (समर्थ), 75 किलो-1) प्रताप कालकुंद्रीकर (एसएस फौंडेशन), 2) रवी गाडीवड्डर (बॉडी पॉवर), 3) मावीज मुल्ला (खानापूर), 4) सिद्धार्थ कुरणे (शिवनेरी), 5) चेतन लोहार (रूद्रा), 80 किलो-1) विशाल चव्हाण (लाईफटाईम), 2) प्रसाद बाचीकर (मंथन), 3) ओमकार कडेमनी (अविग्न), 4) शशीधर किणेकर (रॉ फिटनेस), 5) शशीकांत नाईक (रूद्रा). 80 किलोवरील-1) गजानन काकतीकर (एस.एस.फौंडेशन), 2) शमंत गौडा (अविग्न), 3) प्रताप बाळेकुंद्री (रूद्रा), 4) आकाश नेसरीकर (फिटनेस), 5) दीपक वंन्स (बीएएस).
त्यानंतर हिंडलगा श्री किताबासाठी आकाश निंगराणी, उमेश गंगणे, आकाश रावळ, महेश गवळी, प्रताप कालकुंद्रीकर, विशाल चव्हाण, गजानन काकतीकर यांच्यात लढत झाल्यानंतर प्रताप कालकुंद्रीकर, विशाल चव्हाण, गजानन काकतीकर यांच्यात तुलनात्मक लढत झाली. यामध्ये विशाल चव्हाणने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर हिंडलगा श्री हा मानाचा किताब पटकाविला. उमेश गंगणे व राजकुमार दोरगुडे यांच्यात उत्कृष्ट पोझरसाठी लढत झाली. त्यामध्ये उमेश गंगणे उत्प़ृष्ट पोझरचा मानकरी ठरला.
प्रमुख पाहुणे संजय सुंठकर, रवी कोकितकर, रामचंद्र मन्नोळकर, नागेश मन्नोळकर, आर एन. चौगुले, नागेश सराफ, रामचंद्र कडोलकर, चेतन पाटील, स्वप्नील सांबरेकर, अशोक कांबळे, रामचंद्र कुद्रेमनीकर, डी.एन. चौगुले यांच्या हस्ते हिंडलगा श्री विजेत्या विशाल चव्हाण व उत्कृष्ट पोझर उमेश गंगणे यांना बक्षीस देवून गौरविण्यात आले.
या स्पर्धेसाठी पंच म्हणून एम.के. गुरव, गंगाधर एम., सुनील पवार, अनंत लंगरकांडे, हेमंत हावळ, नूर मुल्ला, प्रशांत सुगंदी, प्रकाश पुजारी, राजू नलवडे, स्टेज मार्शल सुनील राऊत यांनी काम पाहिले.









