वार्ताहर / टोप
कोरोना विषाणू समूह संसर्ग रोखण्यासाठी कोल्हापूरचे जिल्हाधिकाऱ्यांनी सात दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. विविध प्रकारच्या वाहनांनी कायमपणे वर्दळीने गजबजलेला पुणे – बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग लांब पल्याची वाहने वगळता पूर्ण शुकशुकाट जाणवत होता.
लॉकडाऊनमुळे अनेक वेळा महामार्ग ठप्प राहिला आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर महामार्गावर ट्रेलर, ट्रक, , एसटी बसेस, टेम्पो, जीप, कार, दुचाकी अशी अनेक प्रकारची वाहने रात्रंदिवस धावत होती.
आज महामार्गावर फक्त लांबपल्ल्याची ट्रक, दुधाचे टॅंकर, अत्यावश्यक सेवा बजावणारे वाहने धावताना दिसत होती. महामार्गालगतच्या गावात कडकडीत बंद ठेवून लॉकडाऊन कडक केला आहे. कोल्हापुरला शियेफाटा बावडा मार्गे जाणाऱ्या रस्त्यावर असणारी वर्दळ पूर्णपणे ठप्प आहे. विनाकारण महामार्गावर अथवा कोठेही फिरताना दुचाकीस्वार दिसल्यास त्यांच्यावर पोलिस कारवाईचा बडगा सकाळपासुनच सुरु आहे. कोरोनाचा संसर्ग कायमस्वरूपी कमी करण्यासाठी शासन, प्रशासन आरोग्य विभाग प्रयत्न करीत आहे. आजपासुन सात दिवसाचा लॉकडाऊन कडक पाळत कोरोना संसर्ग साखळी तोडूया.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








