सतत होणाऱ्या हल्यामुळे मेंढपाळ अडचणीत
टोप / वार्ताहर
टोप ता. हातकणंगले येथील मेंढपाळ सोमा आणाप्पा सिसाळ यांनी आपल्या मेंढरांचा कळप चार दिवसांपासुन सर्जेराव लक्ष्मण सिसाळ यांच्या टोप गावातील वेताळाचे माळ येथील (गट नं.१३०२) येथील शेतात खतासाठी बसायला आहेत. शुक्रवारी संध्याकाळी ७ ते ८ च्या दरम्यान लांडग्यांनी कळपावर हल्ला केला. या हल्ल्यात सोमा सिसाळ यांची पाच बकऱ्या जाग्यावरच ठार झाल्या असुन चार बेपत्ता आहेत. या हल्ल्यात सोमा सिसाळ यांचे सुमारे पन्नास हजारांचे नुकसान झाले आहे.
सदर हल्ल्याची बातमी मेंढपाळ यांनी यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे व यशवंत क्रांती संघटनेचे शिरोळ तालुका अध्यक्ष दादासो गावडे यांना कळविली संजय वाघमोडे यांनी तात्काळ वनविभाग व पशुसंवर्धन विभागाचे अधिकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली व रीतसर नुकसान भरपाईसाठी घटनेचा रीतसर पंचनामा करण्याची विनंती केली. यावेळी बोलताना संजय वाघमोडे म्हणाले कि, कोल्हापूर जिल्ह्यात अशा घटना वारंवार घडत आहेत. यामुळे मेंढपाळांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाई हि खुपच कमी आहे. तरी नुकसान भरपाई सध्याच्या बाजारभावाप्रमाणे मिळावी अशी मागणी केली.
घटनास्थळी पशुसंवर्धन आधिकारी डॉ. अहमद मुल्ला, सात्ताप्पा जाधव वनपाल नरंदे, दिलीप आप्पा खंदारे वनरक्षक नरंदे, व त्यांचे सर्व सहकारी, यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे, यशवंत क्रांती हातकणंगले तालुका अध्यक्ष यशवंत वाकसे यशवंत क्रांती संघटनेचे युवा नेते सचिन नांगरे, अमोल सिसाळ टोप, शेतमालक सर्जेराव लक्ष्मण सिसाळ, अनिल सिसाळ, यशवंत क्रांती संघटनेचे बहुसंख्य पदाधिकारी व मेंढपाळ उपस्थित होते.









