प्रतिनिधी/ लांजा
लांजाöकुंभारवाडी परिसरात दोन बिबटय़ांचा वावर सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कुंभारवाडी येथे महेश नागले यांनी लावलेल्या सीसीटीव्ही पॅमेऱयामध्ये दोन बिबटय़ांचा घराच्या शेजारी वावर दिसून आला होता. याबाबतची माहिती त्यांनी वनविभागाला दिली. मध्यरात्री एकच्या दरम्यान महेश नागले यांच्या घरासमोर दोन बिबटे एका वासरावर हल्ला करत असल्याचे स्पष्ट दिसून आले. ही माहिती सोशल मीडियावर पसरल्याने कुक्कुटपालन, कुंभारवाडी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पंधरा दिवसापूर्वी कुंभारवाडीत रानटी डुकरांच्या शिकारीसाठी लावलेल्या फसकीत अडकून बिबटय़ाचा मृत्यू झाला होता. पुन्हा बिबटय़ाने आपला मोर्चा कुंभारवाडी परिसरात वळवला आहे. यामुळे नागरिक रात्री-अपरात्री घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत.









