ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
पाकिस्तानने गुरुवारी एका मिसाईलची चाचणी घेतली. हे मिसाईल लाँच झाल्यावर क्षणार्धात कोसळलं. पाकिस्तानच्या सिंधमधील टेस्टिंग रेंजवरून मिसाईल डागण्यात आलं होतं. या मिसाईलची चाचणी 11 वाजता करण्यात येणार होती. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे ही चाचणी 12 वाजता करण्यात आली.
पाकिस्तानी मीडियाने या घटनेचे वार्तांकन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, हा एक नियमित मोर्टार ट्रेसर राऊंड आहे. जो सीमेजवळून डागला गेला होता. पण हे एक मिसाईल असल्याचे सांगण्यात येत आहे. हे मिसाईल लाँच केल्यानंतर काही वेळातच अनियंत्रित झाले आणि सिंध प्रांतातील एका भागात पडले. पाकिस्तानी मिसाईल त्याचे लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरले. पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांनी या मिसाईलच्या लाँचिंगबाबत मौन पाळले आहे. त्यामुळे याबाबतची अधिक माहिती समोर येऊ शकली नाही.









