वॉशिंग्टन
आमेरिकेने मुलांच्या लसीकरणाला वेग देण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेत फायझरच्या लसीला शुक्रवारी मंजुरी दिली गेली असून ही लस तेथील 5 ते 11 वर्षाच्या मुलांना देण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. खाद्य आणि औषध प्रशासन (एफडीए) यांनी फायझर लसीला मान्यता दिली आहे. फायझर इंक आणि बायोएनटेकची कोरोना व्हायरस लस 5 वर्षावरील मुलांना अमेरिकेत यापुढे दिली जाणार आहे. असं जरी असलं तरी या लसींचा पुरेसा स्टॉक सध्या देशात नसल्याची माहिती देण्यात आली आहे. फायझर कंपनीने फार्मसी व बाल चिकीत्सकांना मुलांसाठीच्या फायझर लसीचा पुरवठा केला जाणार असल्याचा खुलासा केला आहे. मागच्या आठवडय़ात सदरची लस शाळेतील मुलांना देण्यात आली होती, ज्याचे सकारात्मक परिणाम समोर आले आहेत. रोगावर नियंत्रण मिळवण्यात ही लस उपयुक्त ठरली असल्याचा दावाही करण्यात आला आहे. 5 ते 11 वर्षाच्या सुमारे 2.8 कोटी मुलांना ही लस देशाला द्यावी लागणार आहे.









