प्रतिनिधी / सांगली
एच.आय.व्ही. संसर्गीत मातेपासून जन्मलेल्या मुलांची एचआयव्ही तपासणी केली जाते. सांगली जिल्ह्यामध्ये एप्रिल ते ऑगस्ट 2021 या कालावधीत 22 मुलांची 6 व्या आठवड्यात DNA-PCR तपासण्या करण्यात आल्या. यात 21 मुलांच्या 18 व्या महिन्यात अँटीबॉडी टेस्ट करण्यात आल्या. यामध्ये सर्व मुले एच.आय.व्ही. निगेटीव्ह आढळून आली. ही जिल्ह्याच्या दृष्टीने मोठी समाधानकारक बातमी आहे. यामध्ये सातत्य राखण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, शहरी आरोग्य केंद्र व सर्व शासकीय व खाजगी रूग्णालयात गर्भवती मातांची एच.आय.व्ही. तपासणी पहिल्या तिमाहीत करून घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या.
जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रम समितीची त्रैमासिक सभा जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र ताटे, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. विवेक सावंत, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त व्ही.व्ही. पाटील यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. विवेक सावंत यांनी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षामार्फत करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांबाबत माहिती देवून आढावा सादर केला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








